कॉमेडियन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बनला बाबा

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

कॉमेडियन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा बनली असून बाळ आणि आई दोघेही स्वस्थ असल्याचं त्याने सोशल मीडियावरून सांगितलं.

मुंबई - कॅामेडी कलाकार कपिल शर्मा हा अपल्या विनोदाने नेहमीच लोकांचे मनोरंजन करत असतो. 'द कपिल शर्मा शो' या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. कपिलचे 2018 मध्ये गिन्नी चतरथ सोबत लग्न झाले. त्यानंतर गिन्नी आणि कपिलला मुलगी झाली. तिच नाव अनायरा ठेवण्यात आले. या आधी अनायरा आणि गिन्नी सोबत कपिलने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट केले होते. 

कपिलची पत्नी गिन्नी चतरथ हीने आज मुलाला  जन्म दिला आहे. कपिलने ही बातमी सोशल मिडीयावरुन सर्वांना दिली आहे. 'नमस्कार,आज सकाळी देवाच्या कृपेने आशिर्वादच्यारुपाने मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी सर्वांचे आभार मानतो.' असं ट्वीट कपिलने पहाटे 5.30 वाजता केले. 

कपिलला आणि गिन्नीला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
कपिलने सोशल मीडियावर गोड बातमी सांगितल्यानंतर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीसुद्दा त्याला शुभेच्छा दिल्या. क्रिकेटर सुरेश रैनाने 'अभिनंदन पाजी वहिनींना आणि मुलांना स्नेह' असं ट्वीटकरून शुभेच्छा दिल्या. अभिनेता मनोज वाजपेयी, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल या सेलिब्रिटींनी कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा दिल्या.

हे वाचा - Virat- Anushka Baby Name: जाणून घ्या विरुष्काच्या मुलीच्या नावाचा अर्थ

बाळासाठी कपिलने केला शो बंद
काही दिवसांपुर्वी द कपिल शर्मा शो तो बंद करणार आहे अशी चर्चा सुरु होती. सोशल मिडीयावर प्रेक्षकांनी कपिलला शो बंद करण्याचे कारण विचारले होते. 'काही दिवस शोबंद राहिल कारण मी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे' असं त्याने प्रेक्षकांना सांगितले होते. ही गुड न्युज दिल्यानंतर कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: comedian kapil sharma blessed baby boy