'कोरोना व्हायरस असल्यामुळेच माझ्या'; कुणाल कामरा का चिडला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोना व्हायरस असल्यामुळेच माझ्या'; कुणाल कामरा का चिडला?
'कोरोना व्हायरस असल्यामुळेच माझ्या'; कुणाल कामरा का चिडला?

'कोरोना व्हायरस असल्यामुळेच माझ्या'; कुणाल कामरा का चिडला?

मुंबई - देशातील प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्या कॉमेडी शो वर बंदी घालण्यात आली आहे. बंगळुरु मध्ये होणाऱ्या त्याच्या कार्यक्रमांसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. यावर नेहमीप्रमाणे कुणालनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्याबाबत आपली प्रतिक्रियाही दिली आहे. कुणालनं यावेळी व्टिट करुन झालेल्या प्रकाराबाबत निषेधही व्यक्त केला आहे. असं काय झालं की, कुणालचा शो रद्द करण्याचे आदेश प्रशासनानं दिले. हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्याला काय आता कोरोना व्हायरसच्या रुपात पाहिलं जातं आहे का....असा सवाल कुणालनं त्याच्या सोशल मीडियावरुन उपस्थित केला आहे.

कुणालनं लिहिलं आहे की, हॅलो बंगलोर, मला तुम्हाला सांगायचं आहे की, येत्या 20 दिवसांमध्ये माझे जे काही शो होणार होते ते आता रद्द करण्यात आले आहे. मी एक कोरोना व्हायरस आहे आणि त्यामुळे मला अशाप्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचे कुणालनं सांगितले आहे. बंगलोरमधील शो आता कोरोनाचे कारण दाखवून रद्द करण्यात आले आहे. प्रेक्षकांची क्षमता आणि सभागृहातील आसनक्षमता यांच्यावरुन प्रशासनानं काही प्रश्न उपस्थित केल्याचे सांगण्यात आले आहे. मला दोन कारणामुळे शो रद्द करण्यात आल्याचे सांगितलं आहे.

त्यापैकी पहिलं कारण म्हणजे, ज्याठिकाणी कार्यक्रम आहे तिथे 45 लोकांपैकी जास्त जणांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मला ज्या धमक्या मिळाल्या आहेत त्याचाही परिणाम शो वर झाला आहे. मला आता असं वाटत आहे की मी कोरोना व्हायरस आणि माझी सगळ्यांना भीती वाटत आहे. हा कोरोनाच्या नव्या नियम आणि गाईडलाईन्सचा भाग असल्याची टिप्पणी कुणाल कामरानं केली आहे.

हेही वाचा: Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'

हेही वाचा: Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

Web Title: Comedian Kunal Kamra Tweet Suppose I Am Seen As A Variant Of Virus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..