
राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचं निधन झाल्याचं त्यांनी सोशल मिडियावर पोस्टद्वारे सांगितलं होतं.
मुंबई- कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचं निधन झाल्याचं त्यांनी सोशल मिडियावर पोस्टद्वारे सांगितलं होतं. आता राजीव यांनी एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील लोकांपैकी फक्त मनिष पॉलने मदत केली असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा: दुबईत पहिल्यांदाच 'या' दिवशी रंगणार 'गल्फ सिने फेस्टिवल'
नुकतंच कॉमेडियन राजीव यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खडतर प्रवासाविषयी सांगितलं आहे. ‘खरं सांगायचं झालं तर माझ्या कठिण काळात इंडस्ट्रीमधील मनिष पॉल व्यतिरक्त इतर कोणीही मला मदत केली नाही. मनिषने मला केवळ आर्थिक मदतच केली नाही तर मानसिक आधार देखील दिला’ असं राजीव यांनी या मुलाखतीत सांगितलं.
राजीव निगम यांचा मुलगा देवराजचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झालं आहे. त्यावेळी त्यांनी सोशल मिडियावर मुलासोबतचा फोटो शेअर करत ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ असं कॅप्शन देत त्यांनी ही दुःखद बातमी शेअर केली होती.
राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केलं आहे. तसंच 'कॉमेडी सर्कस के अजूबे', 'कॉमेडी सर्कस का जादू', 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार', 'ये तो होना ही' था अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय.
comedian rajeev nigam opens up after his son death says nobody except maniesh paul helped him