दुबईत पहिल्यांदाच 'या' दिवशी रंगणार 'गल्फ सिने फेस्टिवल'

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 24 November 2020

गल्फ सिने फेस्ट २०२१’चं आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाचा श्रीगणेशा करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झालीये.

मुंबई-  कोरोनामुळे बॉलीवूड आणि एकुणच मनोरंजन विश्वातील मोठ मोठे महोत्सव, पुरस्कार सोहळे यांना ग्रहण लागलं. गेले सात-आठ महिने मनोरंजन विश्वातील या झगमगाटाचा दिमाख मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेकदा महत्वाचे सोहळे परदेशात साजरे केले जातात. असाच आता एक फेस्टिवल परदेशात रंगणार आहे. गल्फ सिने फेस्ट २०२१’चं आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाचा श्रीगणेशा करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झालीये. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ पहिल्यांदाच दुबईमध्ये २० ते २३ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. 

हे ही वाचा: सिनेनिर्माती निधी हिरानंदानीने दान केलं चक्क ४२ लीटर ब्रेस्टमिल्क   

 मराठी सिनेमाचा हा प्रिमिअर सोहळा असेल. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ची संकल्पना हटके असून यात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये २०२१ मधील आगामी बहचर्चित अशा पाच मराठी सिनेमांती मेजवानी सिनेरसिकांना मिळणार आहे. सोबत त्या त्या सिनेमाची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधेल. विशेष म्हणजे आगामी मराठी सिनेमांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. आखाती देशातील मराठी सिनेरसिकांसाठी नवीन वर्षांची ही अनोखी भेट ठरणार आहे.

‘५ जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसांच्या या रंजक सोहळ्यात सिनेमांच्या मेजवानीसोबतंच इतर मनोरंजक कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी असणार आहेत. ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’च्या निमित्ताने रंगणारा हा धमाकेदार प्रिमिअर सोहळा प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरेल.

gulf cine fest 2021 will be held in dubai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gulf cine fest 2021 will be held in dubai