Raju Srivastava Love Story: भावाच्या लग्नात राजूनं केली 'सेटिंग', तिच्यासाठी त्यानं...Comedian Raju Srivastav Death News viral love story Gajodhar Bhaiya wife Shikha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastava Love Story

Raju Srivastava Love Story: भावाच्या लग्नात राजूनं केली 'सेटिंग', तिच्यासाठी त्यानं...

Raju Srivastava Love Story - कॉमेडियन राजूच्या लवस्टोरीबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. मोठ्या संघर्षातू आपली वेगळी वाट तयार करणाऱ्या राजूनं नेहमीच अनोखा अंदाज कायम ठेवला. म्हणून इतर कॉमेडियनच्या तुलनेत त्याचं (Comedian Raju Srivastav Death News) व्यक्तिमत्व हे चाहत्यांना अधिक भावले. राजूच्या निधनानं आता त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा सोशल मीडियातून मिळतो आहे. त्याला मोठा प्रतिसादही चाहत्यांनी दिला आहे. विशेषत (Raju Srivastav Viral News) राजूच्या भावाच्या लग्नातच त्यानं आपल्या जोडीदाराची निवड केली होती. त्याची ती अनोखी लवस्टोरी अनेकांना माहिती नाही.

राजूच्या भावाचं लग्न फत्तेपूरमध्ये झालं. त्यावेळी राजू कानपूरमधून वऱ्हाड घेऊन त्याठिकाणी गेला. तेव्हा तिथं त्यानं पहिल्यांदा शिखाला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला. पहिल्या नजरेतच त्याचं तिच्यावर प्रेमवर बसलं. काही करुन आपल्याला शिखाशी लग्न करायचं असं त्यानं त्यावेळी ठरवलं. शिखाकडून होकार मिळण्यात अनेक अडचणी होत्या. पण राजू आपल्या निर्णयावर ठाम होता. राजूची लवस्टोरी ही एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी आहे. शिखाकडून होकार मिळवण्यासाठी तो चक्क बारा वर्षे थांबला होता.

* प्रेमासाठी वाट्टेल ते....

कानपूरच्या बाबूपुरवामध्ये राहणाऱ्या राजूनं त्याच्या विनोदी अंदाजानं मोठी लोकप्रियता मिळवली. त्याचा चाहतावर्ग मोठा होता. आपल्या आवडत्या विनोदीवीराच्या लवस्टोरी विषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकताही होती. भावाच्या लग्नात त्याची नजरानजर शिखाशी झाली. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. लग्न करु तर शिखाशीच. असं त्यानं ठरवलं होतं. मात्र त्यासाठी त्याला चक्क बारा वर्षे तिच्याकडून होकाराची वाट पाहावी लागली. प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतात त्याचा प्रत्यय राजूच्या लवस्टोरीतून आल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा: Raju Srivastava Death: रिक्षाचालक ते कॉमेडीचा बादशहा... हास्यसम्राट राजू श्रीवास्तवचं निधन

* शिखाची केली होती चौकशी...

एका मुलाखतीमध्ये राजून सांगितलं होतं की, मला शिखाशी लग्न करायचं हे ठरलं होतं. त्यामुळे मी तिची माहिती गोळा करण्य़ास सुरुवात केली. त्यासाठी मला खूप भन्नाट आयडिया कराव्या लागल्या होत्या. जेव्हा मी चौकशी केल्यानंतर दिलासादायक माहिती मिळाली होती. शिखा राहते कुठे, तिचा मित्र परिवार, तिच्या आवडी निवडी यासाऱ्याची माहिती घेतली होती. शिखाच्या अगोदर तिच्या भावाला पटवलं होतं. काही निमित्त घेऊन आपण तिला भेटायला जायचो. असं राजून त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

हेही वाचा: Raju Srivastava Passed : 'गजोधर भैय्या' गेला! डोळ्यांच्या कडा ओलावल्या...

Web Title: Comedian Raju Srivastav Death News Viral Love Story Gajodhar Bhaiya Wife Shikha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..