कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर.. दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर.. दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू..

कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर.. दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू..

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. बुधवारी, राजू श्रीवास्तव यांना छातीत दुखू लागल्याने आणि जिममध्ये कसरत करत असताना अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना एम्स दिल्लीत दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता ते क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत आहे असंही बोलल जात आहे.

राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. जिममध्ये वर्कआऊट करताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही बातमी ऐकताच राजू यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही आहेत.