अरे हा तर प्रसिध्द कॉमेडियन, रस्त्यावर ज्युस का विकतोय?

comedian Sunil Grover selling orange juice street side says darling ko zaroor pilana
comedian Sunil Grover selling orange juice street side says darling ko zaroor pilana

मुंबई -  फार कमी कॉमेडियन हे असे आहेत की ज्यांचा फॅन फॉलोअर्स टिकून आहे. लोक त्यांची कॉमेडी पाहण्यासाठी उत्सुक असतात. यापूर्वीही सुनील पाल, राजू श्रीवास्तव, राजपाल यादव, यांच्यासारख्या कॉमेडियन्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता ती जागा प्रसिध्द कॉमेडियन सुनील ग्रोव्हरनं घेतली आहे. काही वर्षांपासून तो प्रसिध्दीच्या झोतात आहे. तांडव नावाच्या वेबसीरिजमध्ये त्याला मिळालेली भूमिका सर्वांच्या चर्चेचा विषय झाला होता. त्याच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

सुनील ग्रोव्हरचा आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर हा एका ढाब्यावर दाल मखनी बनवत आहे तर कधी कुठल्याशा ठेल्यावर कुल्फी विकताना दिसतो आहे. यासगळ्यात त्याचा ज्युस बनवतानाचा व्हिडिओ सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केलेला तो व्हिडिओ सुनीलच्या लोकप्रियतेत आणखी वाढ करताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ज्युसविक्रेत्याकडे तो गेला आहे आणि त्यांना मी ज्युस विकून दाखवतो अशी विनंती केली आहे.

सुनीलचा ज्युस बनवण्याचा अंदाज काही औरच आहे. तो सर्वांना आवडलाही आहे. आपण जसे काय एकदम अट्टल ज्युस विक्रेते आहोत असा भाव त्यानं यावेळी आपल्या कृतीतून व्यक्त केला आहे. त्या व्हिडिओला त्यानं एक कॅप्शनही दिलं आहे. तो म्हटला आहे की, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींला हा ज्युस प्यायला द्या. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला मोठ्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत. काही तासांतच त्याला दोन लाखांपेक्षा अधिक व्ह्युजही मिळाले आहेत. काँमेटबॉक्समध्ये त्याला अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजी पाठवल्या आहेत. एका युझरनं लिहिलं आहे की, एखाद्या कार्टुन सारखे आहात तुम्ही. दुस-यानं लिहिलं आहे की, त्या ज्युसची किंमत किती आहे.

काही दिवसांपूर्वी सुनीलचा दाल मखनी बनवतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याला सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सुनीलचा फॅन फॉलोअर्सही मोठे आहेत. केवळ दाल मखनीच नाही तर एका ठिकाणी त्यानं कुल्फी विकण्याचा व्हिडिओ शुट केला होता. त्यावेळी त्यानं लिहिलं होत की, थंडीच्या दिवसांत हे तर माझे ड्रीम प्रोजेक्शन होते. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com