
सुनीलला सर्वाधिक फॉलोअर्स इंस्टावर आहे. तो त्याचे जास्तीत जास्त फोटो इंस्टावर व्हायरल करताना दिसतो.
मुंबई - प्रसिध्द कॉमेडियन सुनील ग्रोव्हर त्याच्या हटक्या व्यक्तिमत्वामुळे प्रसिध्द आहे. त्याचा सोशल मीडियावर चांगला बोलबालाही आहे. त्यामुळए त्याची लोकप्रियता मोठी आहे. तो नेहमी चर्चेत असणारा सेलिब्रेटी झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा ज्युस बनवतानाचा, पानीपुरी तयार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात त्याच्या चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या होत्या. सुनील आता एका अडचणीत सापडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या घरात घुसलेलं माकड.
सुनीलला सर्वाधिक फॉलोअर्स इंस्टावर आहे. तो त्याचे जास्तीत जास्त फोटो इंस्टावर व्हायरल करताना दिसतो. सुनीलच्या किचनमध्ये एक माकड घुसले आहे. त्याने इतका उच्छाद मांडला आहे की त्यामुळे सुनीलची डोकेदुखी वाढली आहे. त्या माकडानं सुनीलच्या किचनमधून दही पळवले. सुनीलनं त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यानं त्या व्हिडिओच्या खाली एक कॅप्शनही दिली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, माकडानं दही पळवलं.
सुनीलच्या घरात स्वयंपाक घरासाठी एक मोठी जागा आहे. त्या प्रशस्त जागेत ते स्वयंपाक घर नसून एखाद्या चित्रपटाचा सेट आहे की काय असे वाटायला लागते. त्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, सुनीलच्या घरात खिडकीतून एक माकड आत येते. आणि ते दह्याचा डबा घेऊन पळत जाते. त्याला पाहिल्यावर सुनीलला हसु आवरत नाही. तो त्याला म्हणतो दही घेऊन चालला काय? काही दिवसांपूर्वी सुनीलनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात त्यानं ढाब्यावर डाल मखनी तयार करत असल्याचे सांगितले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता.
सुनीलच्या वर्कप्रोजेक्ट विषयी सांगायचे झाल्यास त्याच्या तांडव नावाच्या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेषत त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. काही दिवसांपूर्वी सुनील कपिलच्या कॉमेडी शो मध्ये परतणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यानं त्या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे सांगितले.