"भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार"; वीर दासच्या कवितेवरून वाद | Vir Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vir Das

"भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार"; वीर दासच्या कवितेवरून वाद

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कॉमेडियन वीर दासने Vir Das वॉशिंग्टन डीसीमधील केनेडी सेंटरमध्ये भारताबद्दल सादर केलेल्या कवितेवरून वाद निर्माण झाला आहे. 'टू इंडियन्स' Two Indians असं शीर्षक असलेल्या या कवितेत त्याने भारताच्या दोन विविध रुपांचं वर्णन केलं. मात्र या कवितेतील काही ओळींवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ त्याने युट्यूबवर पोस्ट केला असून सहा मिनिटांच्या या परफॉर्मन्समध्ये वीर दासने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. "मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो," या कवितेतील ओळींवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

वीर दासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मुंबई पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याचीही माहिती समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि भाजप-महाराष्ट्राचे कायदेशीर सल्लागार अॅड. आशुतोष जे दुबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर वीर दासविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची प्रत शेअर केली आहे.

हेही वाचा: "विक्रम गोखलेंवर बोलण्याची तुझी पात्रता आहे का?'; स्वराला नेटकऱ्यांनी सुनावलं

"मी अशा भारतातून आलो आहे जिथे मास्क घातलेली मुलं एकमेकांचा हात धरतात आणि जिथे नेते मास्कशिवाय एकमेकांना मिठी मारतात. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आपण बॉलिवूडवरून विभागल्याचा दावा ट्विटरवर करतो आणि आणि थिएटरच्या अंधारात बॉलिवूडमुळे एकत्र आहोत," अशी त्याच्या कवितेची सुरुवात आहे. एकेकाळी महापुरुषांनी निर्माण केलेला भारत लवकरच फक्त आठवण म्हणून राहील, अशी भीती व्यक्त करत त्याने कवितेतून राजकारण, धर्म आणि राष्ट्रीयतेला स्पर्श केला.

loading image
go to top