"विक्रम गोखलेंवर बोलण्याची तुझी पात्रता आहे का?'; स्वराला नेटकऱ्यांनी सुनावलं | Vikram Gokhale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale and Swara Bhasker

"विक्रम गोखलेंवर बोलण्याची तुझी पात्रता आहे का?'; स्वराला नेटकऱ्यांनी सुनावलं

देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने Kangana Ranaut केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभर तीव्र पडसाद उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांनी रविवारी तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्यााचा प्रयत्न करणाऱ्या योद्धांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. विक्रम गोखलेंच्या या विधानावरून मत-मतांतरे होत असताना अभिनेत्री स्वरा भास्करचं Swara Bhasker एक ट्विट चर्चेत आलं आहे. गोखलेंच्या विधानाची बातमी शेअर करत स्वराने ट्विटरवर लिहिलं, 'पद्म पुरस्कार येत आहे'. यासोबतच तिने हात जोडल्याचे इमोजी पोस्ट केले. मात्र स्वराचं हे ट्विट नेटकऱ्यांना रुचलं नाही.

'मराठी कलाकार हे तुझ्यासारख्या अभिनेत्रीपेक्षा खूप प्रतिभावान आहेत. जर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असेल. ते पद्म पुरस्कारासाठी असं बोलणार नाहीत', असं एकाने लिहिलं. तर 'विक्रम गोखलेंच्या प्रतिभेचा कलाकार तयार करण्यासाठी १००० स्वरा भास्कर लागतील', असं दुसऱ्याने म्हटलं. 'कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी विचार कर. ते दररोज तुझ्यापेक्षा अधिक चांगले कलाकार रंगभूमीवरून तयार करतात', अशा शब्दांत युजरने टोला लगावला. विक्रम गोखलेंविषयी ट्विट करणं स्वराला चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा: अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला?

ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राजकारणातील खेळ इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत की, त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस भरडला जात आहे. संकटाच्या कड्यावरून देशाला मागे खेचायचं असेल आणि हे चुकलेलं गणित सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

loading image
go to top