'कॉमेडीच्या बादशहानं' पुण्यातील रस्त्यावर विकले पेन

बॉलीवूडमधील bollywood अनेक अभिनेत्यांचा संघर्ष प्रेक्षकांना माहिती झाला आहे.
'कॉमेडीच्या बादशहानं' पुण्यातील रस्त्यावर विकले पेन

मुंबई - बॉलीवूडमधील bollywood अनेक अभिनेत्यांचा संघर्ष प्रेक्षकांना माहिती झाला आहे. मात्र काही अभिनेते असे आहेत ज्यांच्याविषयी फारसं प्रेक्षकांना माहिती नाही. कॉमेडी रोल करणाऱ्या अभिनेत्यांची मोठी परंपरा बॉलीवूडला आहे. त्यात आवर्जुन घ्यावं असं नाव म्हणजे जॉनी लिव्हर. johny lever साधारण १९८५ ते ९० च्या वेळी या अभिनेत्यानं आपल्या करिअरला सुरुवात केली. अजूनही त्यांचा प्रवास सुरुच आहे. आज हा कलाकार ज्या स्थानावर आहे तिथपर्यत पोहचण्यासाठी त्यानं कमालीचा संघर्ष केला आहे. जगात सगळ्याची सोंग आणता येतात. मात्र पैशाचं सोंग काही आणता येत नाही. हे कटू वास्तव आहे. याचा प्रत्यय त्यावेळी जॉनी लिव्हर यांनाही आला होता.

आपल्याला काही करुन बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा जॉनी लिव्हर यांची होती. मात्र ती काही लवकर पूर्ण झाली नाही. त्यासाठी त्यांना बराचकाळ वाट पाहावी लागली. कॉमेडियन म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्यांना अनेक संकटं पार करावी लागली. जिथं दोन वेळच्या राहण्याची आणि जेवण्याची भ्रांत होती तिथं मोठा अभिनेता होण्याची स्वप्नं पाहणं हा विनोद ठरला असता. मात्र शांत बसतील तर जॉनी लिव्हर कसले. त्यांनी आपल्यातील कलाकाराचा पूर्णपणे उपयोग करुन घेतला. आणि छोट्यामोठ्या नोकऱ्या करुन पैसे मिळवण्यासाठी ते प्रयत्न करु लागले.

आजच्या प्रेक्षकांना सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण कोणेएकेकाळी रस्त्यावर पेन विकण्याचं काम जॉनी लिव्हर यांनी केलं. आज जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या चित्रपट प्रवासाचा आढावा घेणार आहोत. जॉनी लिव्हर यांचं बालपणही खूप कष्टात गेलं. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कनिगीरी मध्ये एका ख्रिश्चन कुटूंबात झाला. त्यांनी अभिनेता सुनील दत्त यांच्या दर्द का रिश्ता चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

पुण्यातल्या रस्त्यावर पेन विकण्याचं काम जॉनी लिव्हर यांनी केलं. पेन विकण्याच्या वेळी ते प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांची मिमिक्री करायचे. एका शो मध्ये त्यांनी आपल्या कष्टमय प्रवासाविषयी सांगितले होते. त्यावेळी दिवसाला शंभर रुपये कमवणं हे त्यांच्यापुढील मुख्य आव्हानं होतं. आणि त्यांनी ते पूर्ण केलं. जॉनी यांच्या एका मित्रानं सांगितलं, आमच्या आजुबाजूला कोणाकडे काही कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही जॉनीला बोलवायचो. तो आम्हाला वेगवेगळ्या अभिनेत्यांची मिमिक्री करुन दाखवायचा.

'कॉमेडीच्या बादशहानं' पुण्यातील रस्त्यावर विकले पेन
आमदाराच्या मुलीला हवी 'थार' गाडी, खासदार सनीचं महिंद्रांना पत्र
'कॉमेडीच्या बादशहानं' पुण्यातील रस्त्यावर विकले पेन
या कलाकारांनी पडद्यावर साकारले प्रभावी राजकारणी

जॉनी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी १९८४ मध्ये लग्न केलं. जॉनी लिव्हर यांना जेमी आणि जेसी नावाची दोन मुलं आहेत. जी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असतात. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात ते अव्वल आहेत. जॉनी यांचे नाव लीवर पडण्यामागेही एक गंमतीशीर कारण आहे. जॉनी यांनी याबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ते हिंदूस्थान लिवरमध्ये कामाला होते. त्यावेळी मी सर्वांची मिमिक्री करायचो. तेव्हापासून माझं नावं हे जॉनी लिव्हर असे झाले. जॉनी यांचा हाउसफुल्ल ४ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com