
Nirmiti sawant, Shreya Bugde: हास्याचे कारंजे उडवणारे किस्से, विनोदी पंच,अनेक कलाकारांच्या नकला, हसून लोटपोट करायला लावणारे स्किट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपस्थितांची फिरकी घेत विनोदाच्या राज्यातील दोन अभिनेत्री धमाल उडवून देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री निर्मिती सावंत आणि श्रेया बुगडे विनोदाचे असे काही बार उडवणार आहेत की प्रेक्षकांवर घरबसल्या मनोरंजनाची आतिषबाजी होणार आहे. निमित्त आहे झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळयाचं.(Comedy queens nirmiti sawant and shreya bugde,zee talkies comedy award show.)
दिवाळीपूर्वीच झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर विनोदाच्या फटाक्यांचा दणका उडणार आहे.
विनोदी नाटक आणि सिनेमातील पडदयावरील व पडद्यामागील कलाकारांचा गौरव होत असताना थिरकायला लावणारे डान्स, हसून लोटपोट करणारे स्किट आणि भन्नाट किस्से अशी मेजवानी झी टॉकीज प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. प्रथमच दोन स्त्रिया करणार अवॉर्ड सोहळ्याचं अँकरिंग करणार आहेत .
रविवारी ९ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचा झगमगता आणि हास्याचे कारंजे फुलवणारा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
प्रेक्षकांना दर्जेदार आणि चांगले सिनेमे पाहता यावेत यासाठी झी टॉकीज या वाहिनीची सुरूवात झाली. १५ वर्षापूर्वी झी टॉकीज ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या आवडीची बनली. झी टॉकीजची निर्मिती असलेल्या अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवलं आहे. झी टॉकीजचा, सिनेमा, नाटक, कलाकार यांच्याशी वेगळा बंध आहे. त्यासाठीच कलाकारांचं कौतुक करण्याकरिता झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचा मंच घेऊन यंदाही जोशात आली आहे.
फक्त आणि फक्त कॉमेडी सिनेमा आणि नाटकातील विविध विभागातील पुरस्कार या सोहळ्यात दिले जाणार आहेत. आता कॉमेडीसाठीचे पुरस्कार आहेत म्हटल्यावर या कार्यक्रमाची सूत्र हातात घेणार आहेत दोन कॉमेडी क्वीन्स. चला हवा येऊ द्या शोमुळे अनेक पात्रांमधून भेटणारी श्रेया बुगडे या सोहळयाची निवेदिका म्हणून भेटणार आहेत. तर तिच्या जोडीला नाटक, मालिका आणि सिनेमा या तीनही माध्यमांध्ये कॉमेडीचा ढोल वाजवणाऱ्या अभिनेत्री निर्मिती सावंत असणार आहेत.
निर्मिती आणि श्रेया यांचे अफलातून विनोदाचे टायमिंग झी टॉकीजच्या कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर तुफान आणणार हे नक्की. या सोहळ्यात श्रेयाच्या मिमिक्रीचा नवा अंदाज पाहता येईल. तर निर्मिती यांच्या कोपरखळ्या, नकला मनोरंजनाची बरसात करणार आहेत.
७ वर्षापूर्वी झी टॉकीजने आणखी नवा प्रयोग केला आणि तो म्हणजे झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड देण्याचा. फक्त विनोदी कलाकृतीमधील कलाकारांचा स्वतंत्रपणे गौरव करणारा मंच झी टॉकीजने निर्माण केला आणि हे झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डचे खास वैशिष्ट्य आहे. नाटक, सिनेमा या माध्यमांमध्ये विनोदी कलाकृतींना मोठी परंपरा आहे. विनोद या एका संकल्पनेवर प्रेक्षकांसाठी अनेक कलाकृती घेऊन येणाऱ्या विनोदी कलाकारांचे कौतुक करण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स हा सोहळा जोशात साजरा होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.