KBC14: शहनशहाचा अश्रूचा बांध फुटला... जया बच्चन बोलून गेल्या अनेक वर्षांपूर्वीची मोठी गोष्ट Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBC14: Amitabh Bachchan breaks down infront of her wife jaya bachchan

KBC14: शहनशहाचा अश्रूचा बांध फुटला... जया बच्चन बोलून गेल्या अनेक वर्षांपूर्वीची मोठी गोष्ट

KBc14: कौन बनेगा करोडपती १४ हा शो भारतात अनेकांचा आवडता शो आहे. अमिताभ बच्चन जेव्हा हॉट सीटवर बसतात तेव्हा भारताची १३० करोड जनता त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आतुर झालेली दिसते. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तानं केबीसीच्या एका एपिसोडमध्ये त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य हॉट सीटवर बसलेले दिसतील. तो प्रोमो पाहिल्यावर नक्कीच आपण विचार करायला लागाल की जया बच्चन या एपिसोडमध्ये अमिताभना असं काय बोलू गेल्या की ज्यामुळे अमिताभ भावूक झालेले पहायला मिळाले. पण ती कोणती गोष्ट जया बच्चन बोलून गेल्या ते अद्याप समोर आलेलं नाही.(KBC14: Amitabh Bachchan breaks down infront of her wife jaya bachchan)

हेही वाचा: KBC14:स्पर्धकानं विचारलं,'तुमचे कपडे कोण धुतं, कपडे रिपीट करता का?; उत्तर देत अमिताभनी मारला सिक्सर

केबीसीच्या प्रोमोची सुरुवात टाइमआऊटच्या आधी हूटर वाजण्यापासून होते. त्यामुळे अमिताभ एकदम अवाक होऊन पहायला लागतात. त्यांना कळत नाही वेळेआधी खेळ कसा संपवला गेला. त्यानंतर हॉट सीटवर बसलेला अभिषेक अमिताभ यांचाच एक प्रसिद्ध डायलॉग मारत घोषणा करताना दिसतो आणि वडीलांना सरप्राइज देत म्हणतो,'रिश्ते में जो हमारी मां लगती हैं...', आणि अचानक जया बच्चन सेटवर येतात. अमिताभ बच्चन यांच्यासाठी हे मोठं सरप्राइज असणार आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या सूटमध्ये जया बच्चन केबीसीच्या सेटवर अवतरतात. त्या अमिताभ बच्चन यांना एक घट्ट मिठी मारतात आणि तत्क्षणी अमिताभ भावूक होतात.

हेही वाचा: Adipurush चा दिग्दर्शक ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला ; म्हणाला,'यात जे दाखवलंय ते...'

खेळाच्या दरम्यान,जया आपल्या चाहत्यांना अशी एक वैयक्तिक आयुष्यातील चाहत्यांना माहीत नसलेली गोष्ट सांगतात जी ऐकल्यावर अमिताभ यांना आपलं अश्रू आवरणं कठीण होऊन बसतं. त्या म्हणतात,''प्रेक्षकांना मला हे सांगावसं वाटतं... '',आणि ही गोष्ट ऐकल्यावर अमिताभच्या अश्रूचा बांध फुटतो. असं काय भावूक जया बच्चन बोलून गेल्या हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

हेही वाचा: Adipurush: 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनावर बंदीची मागणी, दिल्ली कोर्टात याचिका दाखल...

सोनी वाहिनीनं सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,'केबीसीच्या मंचावर आलेल्या स्पेशल गेस्टना पाहून अमिताभ झाले भावूक...',या प्रोमोवर एका प्रेक्षकानं प्रतिक्रिया दिली आहे की,'टीझर पाहून आम्हीही भावूक झालो आहोत.आता ११ ऑक्टोबरच्या एपिसोडची आम्ही मनापासून वाट आहोत'.

अमिताभ ११ ऑक्टोबरला ८० वर्षांचे होणार आहेत. दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांनी ऑगस्टमध्ये केबीसीच्या शूटिंगमधून छोटासा ब्रेक घेतला होता. आता त्यांचा 'गूडबाय' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमात त्यांनी नीना गुप्ता,रश्मिका मंदानासोबत काम केलं आहे.