esakal | VIDEO: पडली.. पडली... भारतीचा झोक्यावरुन गेला तोल....

बोलून बातमी शोधा

commedian bharti singh
VIDEO: पडली.. पडली... भारतीचा झोक्यावरुन गेला तोल....
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कॉमेडी क्वीन म्हणून भारती सिंगची ओळख आहे. सोशल मीडियावरही ती चांगली अॅक्टिव्ह असते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमुळे ती चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातही तिचे नाव घेतले गेले होते. त्यामुळे भारती वादाच्या भोव-यात सापडली होती. आता भारतीचा एक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती नेटक-यांच्या चेष्टेचा विषय ठरली आहे. भारतीचा तो व्हिडिओ ट्रोल झाला आहे.

त्याचं झालं असं की, भारतीचा एक व्हिडिओ इंस्टावर व्हायरल झाला आहे. त्यात भारती एका झोक्यावर बसली आहे. तो झोका झाडाला टांगला आहे. सुरुवातीला भारती त्या झोक्यावर मस्ती करताना दिसून येते. ज्यावेळी ती झोका घ्यायला सुरुवात करते तेव्हा ती झोक्यावरुन खाली पडल्याचे दिसते. अचानक तिचा तोल गेल्यानं ती खाली पडते. या व्हिडिओमधील गंमतीशीर बाब म्हणजे झुल्यावरुन पडल्यानंतर देखील भारती हसत आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. भारतीनं तो व्हिडिओ शेअर करुन त्याखाली एक कॅप्शनही लिहिली आहे. त्यात ती म्हणते, हॅप्पी संडे, पडण्यापासून आपल्याला सावध व्हायला हवं.

भारतीचं लहानपण फारच संघर्षातून गेलं आहे. तिला मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं आहे. अथक परिश्रम करुन तिनं यश संपादन केलं आहे. आता तिला जे यश मिळालं आहे त्यात भारतीच्या कष्टांचा वाटा मोठा आहे. काही दिवसांपूर्वी भारतीच्या आईला कोरोना झाला होता. त्यावेळी तिनं ही गोष्ट सोनु सुदला सांगितली होती. आणि ती गोष्ट सांगताना तिला रडू आले होते. तो व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

त्या व्हिडिओमध्ये भारती म्हणते, कोरोना आपल्या सगळ्यांना रडवत आहे. त्याने अनेकांचा जीवही घेतला आहे. आता माझी आई कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. ज्यावेळी आईचा फोन आला होता तेव्हा आमच्या शेजारी राहणा-या एका काकांचा कोरोनानं मृत्यु झाला होता. भारतीचा हा व्हिडिओ पाहून सोनुसह नोरालाही वाईट वाटले होते.