esakal | जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार, RSS ला तालिबानी म्हणणं भोवलं
sakal

बोलून बातमी शोधा

जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार, RSS ला तालिबानी म्हणणं भोवलं

जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार, RSS ला तालिबानी म्हणणं भोवलं

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जावेद अख्तर यांना त्यांचे एक वक्तव्य भोवले आहे. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बॉलीवूडमधील अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी देखील तालिबानी आणि भारतातील काही मुस्लिम यांची तुलना केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. सध्या जावेद अख्तर हे ट्रोल होताना दिसत आहेत.

जावेद अख्तर यांनी तालिबान आणि आरएसएस बजरंग दल यांची तुलना केली होती. त्यांची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यावरुन त्यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. यामुळे त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एका वकीलानं अख्तर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याची माहिती त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. सध्या त्याची चर्चा आहे. त्यानं आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, अख्तर यांनी जाणीवपूर्वक तालिबानची तुलना ही आरएसएस आणि बजरंग दलाशी केली आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश हा समाजात जाताना दिसतो. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीमध्ये आपण असे नमुद करण्यात आले आहे की, तातडीनं अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

इतकेच नाही तर भाजपच्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांनी जावेद अख्तर यांच्या घरासमोर निदर्शनं केलं होतं. त्या आंदोलकांचे असे म्हणणे आहे की, आतापर्यत आरएसएसनं कित्येक लोकांची मदत केली आहे. त्यांना आधार दिला आहे. कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. अशावेळी एखादी व्यक्ती आमच्यावर अशा प्रकारची टीका कशी करु शकते. असा प्रश्न त्या आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. अख्तर यांनी जे विधान केलं आहे त्याबदद्ल त्यांनी जाहीर माफी मागावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालिबान भारतातील काही संघटना यांची होणारी तुलना आणि त्याची सोशल मीडियावर होणारी चर्चा मोठ्या प्रमाणावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

loading image
go to top