Condom कंपनीही पडली टायगरच्या 'छोटी बच्ची हो क्या' डायलॉगच्या प्रेमात...

टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2' आता प्रदर्शित झाला आहे, पण पहिल्या भागातील डायलॉग गेल्या काही दिवसांपासून जोरदार व्हायरल झाला आहे.
Condom company also enjoyed the dialogue of Tiger Shroff's 'Chhoti Bacchi Ho Kya', Viral tweet
Condom company also enjoyed the dialogue of Tiger Shroff's 'Chhoti Bacchi Ho Kya', Viral tweetGoogle

जर आपण टायगर श्रॉफचा(Tiger Shroff) 'हिरोपंती'(Heropanti) सिनेमा पाहिला असेल तर कदाचित त्या सिनेमातला व्हायरल झालेला 'छोटी बच्ची हो क्या' हा डायलॉग देखील नक्कीच माहित असेल आपल्याला. सिनेमाचा आता दुसरा भाग येत आहे,पण याच्या पहिल्या भागातील डायलॉगनं सोशल मीडियावर हंगामा केला आहे. नेटकरी एकदम पिसाटल्यासारखे सिनेमातील या डायलॉगचे मीम्स शेअर करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर स्वतः टायगर श्रॉफ या मीम्सची मजा घेताना दिसत आहे. आणि यातच आता ड्यूरेक्स या Condom ब्रॅन्डनं आपल्या खास अंदाजात या 'छोटी बच्ची हो क्या' डायलॉगवर मीम्स बनवलं आहे, आणि हे मीम तर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे.

Condom ब्रॅंडनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''किती वेळा सांगितलं प्रोटेक्शन यूज कर,छोटे बच्चे करने है क्या?'' एवढंच नाही तर ट्वीटमध्ये त्यांनी टायगर श्रॉफचा हा डायलॉग पूर्ण लिहिला आहे आणि नंतर त्यांनी त्यातला अर्धा डायलॉग काढून स्वतःचा नवीन डायलॉग अॅड केला आहे. ड्युरेक्सनं हे ट्वीट २३ एप्रिलला केलं होतं जे आता व्हायरल होत आहे. आता हे काही पहिल्यांदाचा घडत नाही काही. कारण ड्युरेक्सकडून अशा पोस्ट अनेकदा केल्या गेल्या आहेत,ते आपल्या प्रॉडक्टचं प्रमोशन करण्यासाठी असं नेहमी करतात. याआधी ड्युरेक्सनं रणबीर आणि आलिया भट्टला खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Condom company also enjoyed the dialogue of Tiger Shroff's 'Chhoti Bacchi Ho Kya', Viral tweet
'करिअर संपलंय त्या कळलाव्याचं'; कंगनानं पुन्हा साधला करण जोहरवर निशाणा

खरंतर 'हिरोपंती' सिनेमाशी टायगर श्रॉफचं खास बॉन्डिंग आहे. कारण त्यानं या सिनेमापासूनच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हिरोपंती मध्ये टायगर श्रॉफसोबत क्रिती सनननं काम केलं आहे. आज २९ एप्रिल,२०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात टायगरसोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्दिन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com