बिग बॉसच्या घरामध्ये घुमणार 'राधे राधे'चा गजर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

सलमानच्या या शोमध्ये यावेळी वादग्रस्त राधे माँ स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं कळतंय. राधे माँ यांना 'बिग बॉस १४' साठी विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून कळत आहे.  

मुंबई- सलमान खानचा मोस्ट अवेटेड 'बिग बॉस १४' हा शो यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असल्याचं कळतंय. यावेळी बिग बॉसमध्ये १६ स्पर्धक असतील त्यातील १४ सेलिब्रिटी तर ३ सामान्य लोक असतील असं म्हटलं जातंय. सुत्रांच्या माहितीनुसार सलमानच्या या शोमध्ये यावेळी वादग्रस्त राधे माँ स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं कळतंय. राधे माँ यांना 'बिग बॉस १४' साठी विचारणा करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून कळत आहे.  

हे ही वाचा: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या दोन कर्मचा-यांना कोरोनाची लागण, जॅकलीननेही केली कोविड-१९ची टेस्ट   

सुखविंदर कौर ज्या राधे माँ म्हणून लोकप्रिय आहेत त्यांना बिग बॉसच्या मागच्या सीझनसाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी शोमध्ये एंट्री घेतली नाही. यावेळी लॉकडाऊनमुळे बिग बॉस १४ ची प्रेक्षत आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा सीझन कोरोनाच्या काळातील असल्याने हटके देखील असणार असल्याने आधीच याची खूप चर्चा आहे. या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याविषयी अनेक नावं आत्तापर्यंत समोर आली आहेत. मात्र चॅनलकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. 

सुखविंदर कौर ज्या स्वतःला देवीचा अवतार म्हणत राधे माँ म्हणवतात त्या त्यांच्या पेहरावामुळे, त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. लोकांना 'आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट' म्हणत सुखविंदर यांनी सोशल मिडियावर खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे जर यावेळी त्यांनी शोमध्ये एंट्री घेतली तर सगळ्या सेलिब्रिटींसोबत त्यांची वागणूक कशी असेल, या कलाकारांसोबत त्या कशा ऍडजस्ट होतील, रिअल लाईफमध्ये त्या कशा आहेत हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल आणि अर्थात बिग बॉस शो देखील यामुळे चर्चेत राहिल. 

controversial radhe ma will enter the house in bigg boss 14 this season will be seen in double blast  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversial radhe ma will enter the house in bigg boss 14 this season will be seen in double blast