
'तेरी भाभी' या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळतेय.
मुंबई- वरुण धवन हा बॉलिवूडमधल्या यंगस्टर्स अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो चर्चेत आहे ते त्याच्या आगामी सिनेमामुळे. वरुण लवकरंच 'कुली नंबर वन' या आगामी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमातील 'तेरी भाभी' हे गाणं रिलीज झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
हे ही वाचा: कविता कौशिकच्या पतीने केली अभिनव शुक्लाची पोल खोल, 'त्याने नशेत माझ्या पत्नीला..'
'तेरी भाभी' या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात दोघांचीही खूप सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळतेय. जावेद मोहसीन, देव नेगी आणि नेहा कक्कर या तिघांनी मिळून हे गाणं गायलं आहे. शिवाय दानेश साबरी याने या धमाकेदार गाण्याची निर्मिती केली आहे.
‘कुली नंबर १’ हा आगामी सिनेमांपैकी सगळ्यात चर्चेत असलेला सिनेमा आहे तसंच वर्षातील सर्वात मोठ्या बॉलिवूड सिनेमांपैकी एक आहे. गेल्या वर्षीपासून या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. 'कुली नंबर १' हा सिनेमा १९९५ साली रिलीज झालेल्या 'कुली नंबर १' चा रिमेक आहे. या सिनेमात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर या नव्या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान झळकणार आहेत. प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची खूप उत्सुकता आहे. गाण्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता चाहते हिट गाण्यांची आणि रिमेक गाण्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
coolie no 1 first song teri bhabhi song launch varun dhawan sara ali khan