कविता कौशिकच्या पतीने केली अभिनव शुक्लाची पोल खोल, 'त्याने नशेत माझ्या पत्नीला..'

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 4 December 2020

काही दिवसांपूर्वीच्या एपिसोड दरम्यान कविताने रुबिनाचा पती अभिनव शुक्लाला त्याची पोलखोल करण्याची धमकी दिली होती आणि वाईट शब्दप्रयोग केले होते

मुंबई-  'टीव्हीवरील सगळ्यात चर्चेत असलेला आणि वादग्रस्त शो बिग बॉस १४ हा फिनाले विक सुरु आहे. फिनालेच्या आधी घरात कविता कौशिकचं रुबीना दिलैकसोबत झालेल्या भांडणानंतर ती बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाली. काही दिवसांपूर्वीच्या एपिसोड दरम्यान कविताने रुबिनाचा पती अभिनव शुक्लाला त्याची पोलखोल करण्याची धमकी दिली होती आणि वाईट शब्दप्रयोग केले होते आणि शो सोडून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता कविताचा पती रोनित बिश्वासने ट्विटरवर अभिनव शुक्लाच्या बाबतीत काही सनसनीखेज आरोप केले आहेत.  

हे ही वाचा: गायिका नेहा कक्कर लग्नानंतर पहिल्यांदाच पती रोहनप्रीतसोबत झळकली पडद्यावर  

कविता कौशिकचा पती रनित बिश्वासने एकानंतर एक अनेक ट्विट करत अभिनव शुक्लाच्या विरोधात धक्कादायक खुलासे केले आहेत आणि आरोप केले आहेत. त्याने एकानंतर एक ट्विट केले आहेत. रोनित विश्वासने लिहिलंय, ''मला असं वाटतं की आता सत्य उघडकीस आणण्याची वेळ आली आहे. टीव्हीवर दिसणारा हा माणुस जेंटलमॅन नाहीये. अभिनवला अल्कोहोल घेण्याची सवय आहे. त्याने नशेत असताना माझ्या पत्नीला अनेकदा फोन केला होता. तो माझ्या पत्नीला अर्ध्या रात्री भेटण्यासाठी बोलवायचा. एकदा तर अशी हालत झाली होती की मला आणि माझ्या पत्नीला त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी लागली होती.''

त्याने पुढे लिहिलंय, ''हा तोच माणुस आहे ज्याने कामासाठी आमच्याकडे भीक मागितली होती. मी माझ्या घरी त्याला शूटींग करण्याची परवानगी दिली होती. आता अभिनव शुक्ला बोलतोय तो त्याच महिलेसोबत बदला घेणार आहे. तो स्वतःला मर्द म्हणवतो हे खरंच सत्य आहे का?'' रोनितच्या या ट्विट्समुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  

kavita kaushik husband ronnit biswas shocking revelations about abhinav shukla  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kavita kaushik husband ronnit biswas shocking revelations about abhinav shukla