Coolio Death: मित्राच्या बाथरुममध्ये पडून ग्रॅमी ॲवॉर्ड विजेत्या रॅपरचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rapper Coolio Death

Coolio Death: मित्राच्या बाथरुममध्ये पडून ग्रॅमी ॲवॉर्ड विजेत्या रॅपरचे निधन

Coolio Grammy Award Winner: प्रस्थापितांच्या विरोधात आपल्या गाण्यानं हल्लाबोल करणाऱ्या कुलियोला असा मृत्यु येईल असे कुणाला वाटले नव्हते. त्याच्या एका मित्राच्या बाथरुमध्ये पडून त्याचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध रॅपर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या कुलियाच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो एक विख्यात रॅपर होता. बंडखोरी, जे आवडले नाही त्याच्याविरोधात सडकून टीका करण्यात कुलियो हा नेहमीच आघाडीवर असायचा.

कुलियोनं 80 च्या दशकात त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याची दखल घेतली गेली. मग त्यानं काही मागे वळून पाहिले नाही. त्याच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली. 1995 मध्ये आलेल्या गँगस्टा पँरेडाईज पासून त्याचे नाव झाले. डेंजरस माईंड नावाच्या चित्रपटामध्ये ते गाणं व्हायरल झालं होतं. तेव्हापासून कुलियो हा सगळ्यांच्या चर्चेत आला. त्याचे गाणे हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले होते. त्यासाठी त्याला ग्रॅमी अॅवॉर्डनं गौरविण्यात आले होते.

वयाच्या 59 व्या वर्षी कुलियानं अखेरचा श्वास घेतला. लॉस एंजेलिसमध्ये त्याचा मृत्यु झाला. त्यानं त्याच्या संगीत करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली. त्यात सर्वाधिक गाजलेलं गाणं म्हणजे गँगस्टा पॅराडाईज असे होते. त्याच्या मॅनेजर आणि मित्र जारेज पोसीनं कुलियोच्या मृत्युविषयी माहिती दिली आहे. एका वेबपोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या घरी गेला असताना बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन तो पडला. त्यात त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Balbharti: सिद्धार्थ जाधव म्हणतोय, घरातल्या प्रत्येकासाठी ‘बालभारती'

कुलियोच्या गाण्यांविषयी सांगायचे झाल्यास, हिअर इट गोज, माय सोल, कॅनॉन अँड केल या गाण्यांना श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्याची लोकप्रियताही वाढली. जगभरात त्याचे नाव झाले. केवळ गायकीच नाहीतर अभिनयामध्ये देखील कुलियोनं नशीब आजमावून पाहिलं होतं.

हेही वाचा: KRK In RSS: 'माझं ठरलं RSS मध्ये जातोय!' केआरकेचं ट्विट चर्चेत