तारक मेहताच्या कलाकारांना मिळतोय घरबसल्या पगार, टेन्शन कसलं?

मनोरंजन क्षेत्रातील चित्रही गंभीर आहे. कित्येक मालिकांचे चित्रिकरण रखड़ले आहे.
Tarak mehta ka ulta chasma
Tarak mehta ka ulta chasma Team esakal

मुंबई - कोरोनानं सर्वांना मोठ्या आर्थिक चिंतेत टाकलं आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कित्येकांच्या नोक-याही गेल्या आहेत. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे. आयटी सेक्टरमध्येही चित्र दयनीय आहे. मनोरंजन क्षेत्रातील चित्रही गंभीर आहे. कित्येक मालिकांचे चित्रिकरण रखड़ले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील (TMKOC) (Tarak mehta ka ulta chasma) कलाकारांनाही मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. during the corona period taarak mehta producer is helping his artists asit modi are giving salary

तारक मेहता का उल्टा चष्माच्या मालिकेतील कलाकारांनी कोरोनाच्या (pandemic period) काळात आपले अनुभव विशद केले आहेत. एकीकडे अनेकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत असताना या मालिकेतील कलाकारांनी आपल्या घरबसल्या पगार मिळत असल्याचे सांगितले आहे. निर्मात्यांकड़ून वेळेवर पगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात अनेक मालिकांच्या निर्मात्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं आहे. यासगळ्यात तारक मेहता का उल्टा चष्मा ही अशी मालिका आहे जिला कमी प्रमाणात तोटा झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेतील कलाकारांना गेल्या काही महिन्यापासून काम न करताही वेळेवर पगार मिळत आहे. सध्या काही टीव्ही शो ज बंद झाले आहेत. दुसरीकडे अनेक शो चे रिपिट टेलिकास्ट (repeat telecast) सुरु करण्यात आले आहेत. त्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येत आहे. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. याला कशाप्रकारे सामोरं जावं असा प्रश्न त्या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना पडला आहे.

Tarak mehta ka ulta chasma
हरभजनला हवं होतं रेमडेसिव्हिर, सोनु सूद मदतीला धावला...
Tarak mehta ka ulta chasma
Radhe Review: फिकी पडली 'भाईजान'ची जादू

तारक मेहताच्या निर्मात्यांनी लोकेशन बदलले आहे. त्यामुळे चित्रिकरण करताना कोणत्याही अडचणी यायला नकोत. तसेच जे कलाकार सेटवर येत नाहीत त्यांना घरबसल्या पगार देण्याचे कामही यावेळी केले जात आहे. सध्या या मालिकेतील कलाकार त्यांना जसे जमेल त्याप्रमाणे शुटिंग करत आहेत. त्यांना बेसिक सॅलरी देण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना या मालिकेत अब्दुलची भूमिका करणारे कलावंत शरद सांकला यांनी सांगितले की, आमच्या मालिकेची चित्रिकरण आता गुजरात मध्ये होत आहे. सध्या कोरोना लक्षात घेऊन तारक मेहताची स्क्रिप्ट लिहिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com