esakal | Radhe Review: फिकी पडली 'भाईजान'ची जादू
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan Radhe movie review

Radhe Review: फिकी पडली 'भाईजान'ची जादू

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - असं म्हटलं जातं की बॉलीवूडमधल्या भाईजानचे चित्रपट हे लॉजिक बाजुला ठेवून पाहायचे असतात. कारण त्यात लॉजिकल असं काही नसतं. त्यापेक्षा एखादा मारधा़डवाला साऊथचा मुव्ही पाहणे बेस्ट ऑप्शन आहे. पण सलमानच्या फॅन्सला त्याचा कुठलाही नवा चित्रपट आला तरी त्याचं फार अप्रुप असतं. जसं ते आता त्याच्या राधे युवप मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाचंही होतं. आज हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर ज्या प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित झाला होता त्याचं सर्व्हर हँग झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत होत्या. त्यामुळे राधे म्हणजे एकदम तुफानी मुव्ही असल्य़ाचा भास काही वेळेसाठी झाला असे म्हणता येईल. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. त्याच्या प्रमोशनसाठी जे वेगवेगळे फंडे तयार करता येतील ते त्यानं केलं पण....

सध्या मनोरंजनाच्या क्षेत्रात नव्यानं काही होत नसलं तर दोन वर्षांपासून पेंडिंग असलेला सलमानचा हा चित्रपट निव्वळ टाईमपास म्हणून पाहायला हरकत नाही. त्यात काहीही होऊ शकतं. फार लॉजिक लावण्याच्या भानगडीत पडू नका. इतर त्याच्या मुव्ही प्रमाणेच हाही टिपीकल पॉपकॉर्न मुव्ही आहे हे यानिमित्तानं सांगावसं वाटतं.

काच फोडून सलमानची होणारी एंट्री, मोबाईलवरुन अॅम्ब्युलन्स पाठवण्याचा दिलेला संदेश, डोळ्यांना काच लागल्यानं झालेली जखम ...पुन्हा हाच सीन स्लो मोशनमध्ये दाखविण्याचा दिग्दर्शक प्रभुदेवाचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला नाही. थिएटरमध्ये या सीनला त्याच्या चाहत्यांच्या उड्या पडल्या असत्या. टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या असत्या. मात्र आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. निर्माता आणि दिग्दर्शक यांना हा चित्रपट फार यशस्वी होईल असे वाटते मात्र तसे होण्याची शक्यता कमी आहे.

राधे मधला हिरो हा एक एनकाऊंटर स्पेशॅलिस्ट दाखवला आहे. दहा वर्षात त्याच्या २३ वेळा ट्रान्सफर झाल्या आहेत. आणि त्यानं 97 एनकाऊंटर केले आहेत. राधेला एकदा सस्पेंडही करण्यात आलं होतं. मात्र तो पुन्हा पोलीस दलात येतो. त्याला आणलं जातं. यामागचं कारण म्हणजे मुंबईमध्ये अंमली पदार्थांचा वाढणारा काळाबाजार. तो रोखण्यासाठी राधेला पाचारण करण्यात येतं. अंमलीपदार्थ पुरवण्याचे काम राणा करत असतो. हे सगळं काम कसं चालतं, राधे त्या गुंडाना कसं मारतो. मुंबईला कसं वाचवतो, यासाठी राधे पाहावा लागतो. यासगळ्यात आपल्याला सलमानच्या त्या गाण्याची आठवण येत राहते जे काही दिवसांपूर्वी युट्युबवर ट्रेंडिंग होतं.

सलमानच्या चित्रपटांचा एक फॉर्मेट ठरला आहे. तो त्याच्या बाहेर जायला सहसा तयार नसतो. समाजात होणा-या अन्याय आणि अत्याचारा विरोधात आवाज उठवून आपण न्याय देण्यास कसे पात्र आहोत हे दाखवण्याची सलमानची सवय जूनीच आहे. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांमधून आपल्याला हे दिसून येईल. राधेची पटकथा एकदम सपाट आहे. त्यात फारसं थ्रिलिंग वाटावं असं काही नाही. संवाद पाचंट आहेत. लक्षात राहावीत अशी गाणीही तर यात नाहीच. सगळा खेळ एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफीचा आहे. त्यावर बरीच मेहनत घेतली गेली आहे. असं राधे पाहिल्यावर दिसून येतं.

फार अपेक्षा घेऊन राधे पडद्यावर आला होता. मात्र त्याला त्यामानानं यश मिळेल असं वाटत नाही. कलाकारांच्या अभिनयाची गोष्ट करायची त्यात सलमानच्या जोडीला असणा-या दिशा पटानीला फारशी संधी मिळालेली नाहीये. सलमानचा अभिनय याविषयी काही सांगण्यापेक्षा राधे पाहून तुम्हीच ठरवा तो कसा आहे?

हेही वाचा: इरफान पठाण - कंगणाची जुंपली, जाणून घ्या कारण

हेही वाचा: 'ही राक्षसी वृत्ती'; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान-परिणीतीचा संताप

सलमानला त्याचा फॅनक्लब माहिती आहे. त्यांची आवड माहिती आहे. त्यामुळे तो जास्त डोकं लावण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यानं काहीही केलं तरी ते त्याच्या चाहत्यांना भावतं. ब-याच दिवसांपासून त्याच्या फॅन्सला काही दमदार, हटके पाहायला मिळेल अशी अपेक्षा त्याच्या चित्रपटाकडून होती. ती काही अंशी यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल. बाकी सगळा गोंधळ आहे.

Movie Review: राधे: योर मोस्ट वांटेड भाई

पटकथा आणि संवाद: ए सी मुगिल, विजय मौर्य

कलाकार: सलमान खान, दिशा पटानी , जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा

दिग्दर्शक -  प्रभु देवा

ओटीटी: जी5

रेटिंग: **

loading image
go to top