या अभिनेत्याने प्रवासी मजूरांना केली चपलांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

रस्त्याने पायी, सायकलवर किंवा ट्रकमधून जाणाऱ्यांसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले. यात पायी जाणाऱ्या शेकडो मजुरांना मनिष पॉल या अभिनेत्याने चप्पलांचे नवीन जोड दिले. तर काहींना घरी जाण्यासाठी पैशांची देखील मदत केली आहे. 

कोरोना व्हायसनमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. त्यात स्थलांतरीत मजुरांसाठी लॉकडाऊन हा काळ खूप कठीण सुरु आहे. लॉकडाउनमुळे घरी जाण्याची धडपड मजुरांची होती. अशात रस्त्याने पायी, सायकलवर किंवा ट्रकमधून जाणाऱ्यांसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले. यात पायी जाणाऱ्या शेकडो मजुरांना मनिष पॉल या अभिनेत्याने चप्पलांचे नवीन जोड दिले. तर काहींना घरी जाण्यासाठी पैशांची देखील मदत केली आहे. 

घरी जाणाऱ्या मजुरांना अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहे. त्यात सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींनी देखील मदत केली आहे. काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद चर्चेत होता. त्यानंतर मनीष पॉलनेही या श्रमिक मजूरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. मुंबई आणि दिल्ली येथे रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या पाचशेहून अधिक श्रमिकांना मनीषने चपलांची मदत केली आहे. तसेच चाळीस मजुरांची घरी जाण्याची व्यवस्था केली. तसेच त्यांना अन्नधान्याची सोयही करुन प्रवास करतेवेळी काही अडचण येवू नये म्हणून पैसेही दिले आहे. 
मनिषने पॉलने याअगोदर 20 लाखांची मदत केली होती. तसेच त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याने आधीच पगार दिला आहे. काहि दिवसांपूर्वी त्याने "व्हॉट इफ' हा लघुपट युट्यूबवर शेअर केला होता. या लघुपटात लॉकडाऊनवर एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे. या सिनेमातून मिळालेले उत्पन्नही मनिषने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. याबाबत मनिष पॉल म्हणाला, की कोरोनाचे संकट देशभर सुरु आहे. दिवसेंदिवस मृत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यात गोरगरिब, मजूर, श्रमिक जास्त अडचणी आहेत. त्यात हजारो श्रमिक आपआपल्या घरी जाण्यासाठी पायी चालत जात आहे. या सर्व गोष्टी खूप त्रास देवून जात आहेत. म्हणून एकमेकांची मदत करत पुढे कसे जावे हे मनिष पॉलने पायी चालत जाणाऱ्या श्रमिकांना मदत करुन सिध्द केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus lockdown piriad worker on road help actor