esakal | कोरोनाचा उद्रेक! माधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

dance deewane

मुंबईतील गोरेगाव येथे सुरू आहे शूटिंग

कोरोनाचा उद्रेक! माधुरी दीक्षितच्या 'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'डान्स दिवाने' या डान्स रिअॅलिटी शोच्या १८ क्रू मेंबर्सना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गोरेगावमधील फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये या शोची शूटिंग सुरू होती. सेटवरील १८ क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे हे तिघेजण या शोचे परीक्षक आहेत. तर राघव जुयाल या शोचं सूत्रसंचालन करतो. 'ई टाइम्स टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, शूटिंग बंद पडू नये म्हणून या शोचे निर्माते अरविंद राव यांनी ताबडतोब इतर १८ जणांची सेटवरील कामासाठी नियुक्ती केली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइजचे सचिव अशोक दुबे याविषयी म्हणाले, "ही अत्यंत गंभीर बाब आहे. सेटवरील ज्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. या शोमध्ये काम करणाऱ्यांची आधी कोरोना चाचणी केली जाते. पुढील शूटिंग ५ एप्रिल रोजी असल्याने नवीन लोकांना कामावर घेता येईल. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या क्रू मेंबर्सनाच काम करण्याची परवानगी देण्यात येईल."

हेही वाचा : 'सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह'; सलील कुलकर्णींना कोरोना

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कलाविश्वातील अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आमिर खान, आर. माधवन, विक्रांत मेस्सी, रोहित सराफ, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली. राज्यात सोमवारी ३१,६४३ बाधितांची नोंद झाली. तर गेल्या सहा दिवसांमध्ये राज्यात दोन लाखांच्या आसपास नव्या रुग्णांचे निदान झाले. राज्यात रविवारी उच्चांकी ४०,४१४ नवे रुग्ण आढळले होते. तर गेल्या २४ तासांत १०८ जणांचा मृत्यू झाला.

loading image