Valentine Day: KL राहुलनं तोडलं लाखो तरुणींचं हृदय| Cricketer K L Rahul Athiya Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K L Rahul And Athaiyya Shetty
Valentine Day: KL राहुलनं तोडलं लाखो तरुणींचं हृदय

Valentine Day: KL राहुलनं तोडलं लाखो तरुणींचं हृदय

Entertainment News: क्रिकेटपटू के एल राहुल (k l rahul) आणि बॉलीवूड अभिनेता (Bollywood Actor) सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांची मैत्री सोशल मीडियापासून लपून (Social media news) राहिलेली नाही. ते नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. आता के एल राहुल सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. त्यानं अखेर अथियाला प्रपोझ केल्याची पोस्ट शेयर केली आहे त्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. अनेक दिवसांपासून अथिया आणि के एल राहुल यांच्या नावाची चर्चा होती. त्यावर त्याला अथियानं दिलेलं उत्तरही खासचं आहे.

व्हँलेटाईन डेच्या निमित्तानं आज अनेकजण आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रती मनातील भावना व्यक्त करतात. जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये व्हॅलेटाईन साजरा केला जातो. आता भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि अथिया यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी व्हॅलेंटाईनवर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर केल्या आहेत. राहुल हा आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. याशिवाय तो भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधारही आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका दौऱ्यावर केएल राहुल आणि अथिया या एकत्र दिसून आले आहेत. त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. केएल राहुलनं लिहिलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: Underwater Photoshoot Viral : या अभिनेत्रीच अंडरवॉटर फोटोशूट व्हायरल ; पाहा व्हिडीओ

राहुलनं जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये अथिया सेल्फी घेताना दिसून येत आहे. हे फोटो त्यांच्या व्हॅकेशनचे आहेत. त्यामध्ये अथियानं ब्लॅक कलरची जीन्स परिधान केली आहे. आणि प्रिंटेड हुडीदेखील घातली आहे. तर राहुल हा व्हाईट कलरच्या टी शर्टमध्ये आहे. आणि त्यानं ग्रे कलरची पँट परिधान केली आहे. राहुलनं आपण शेयर केलेल्या त्या पोस्टला हॅप्पी लव्ह डे असं म्हटलं आहे. त्यानं इमोजही शेयर केलं आहे. राहुलच्या त्या पोस्टवर अथियानं गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं देखील राहुलच्या त्या फोटोवर हार्टचा इमोजी शेयर केला आहे.

Web Title: Cricketer K L Rahul Athiya Shetty Selfi Valentine Day Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top