Cricketer MS Dhoni करणार चित्रपट क्षेत्रात एन्ट्री; दाक्षिणात्य अभिनेत्री Nayanthara शी हातमिळवणी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni is entering in tollywood news viral on social media

Cricketer MS Dhoni करणार चित्रपट क्षेत्रात एन्ट्री; दाक्षिणात्य अभिनेत्री Nayanthara शी हातमिळवणी ?

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू एम एस धोनीची फॅन फॉलोविंग क्रिकेटच्या क्षेत्रात जगभर दिसून येते.चित्रपटात या खेळाडूने करियर आजमवायचं म्हटलं तरी धोनीला फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही.कारण त्याच्या चित्रपटाला बघण्यासाठी फॅन्सचा(Cricket) भला मोठा वर्ग आधीच रेडी असेल.क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीचे तामिळनाडूमध्ये भरपूर चाहते आहेत आणि याठिकाणी त्याला 'थाला' म्हणतात.त्यामुळे त्याच्या चित्रपट येण्याची बातमी ऐकताच अनेकांचा आनंद द्विगुणीत झालाय.रीयल हिरो आता चित्रपटाचा हिरो म्हणून पुढे येतोय.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धोनीने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी नयनताराशी हातमिळवणी केली आहे.पण तुम्ही जर का या चित्रपटात नयनतारासोबत धोनी दिसणार या आशेत असाल तर तो तुमचा गैरसमज ठरेल.कारण धोनी अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश करतोय.(Movie)यामध्ये संजयही त्याच्यासोबत असणार आहे. संजय रजनीकांतचा जवळचा असल्याचे सांगितले जाते.आयपीएल नंतर लगेच त्याच्या या प्रोजेक्टची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितल्या जात आहे.यानंतर लगेच चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात होणार आहे.

धोनीच्या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने आपल्या अभिनयाने आणि साधेपणाने धोनीचे आयुष्य पडद्यावर उत्तमरित्या दाखवले होते. याशिवाय अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही तामिळ चित्रपट 'डिक्किलूना'मध्ये कॅमिओ केला होता आणि 'फ्रेंडशिप' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.(Cricket)अभिनेत्री नयनताराही लवकरच बॉलीवुड एन्ट्री करणार असल्याचे कळते आहे.तिने शाहरूख खानशी एक चित्रपट साईन केल्याचे कळते आहे.मात्र त्याचे टायटल अद्यापही समोर आले नाही.यापूर्वी नयनताराने साऊथचे अनेक हिट चित्रपट केले आहे.तिने रजनीकांतसोबत 'दरबार'सारखा हिट चित्रपट केलाय.

Web Title: Cricketer Ms Dhoni Shacking Hand With Nayantara For His First Tollywood Movienews Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top