'दादासाहेब नव्हे तर मामासाहेब मोदी पुरस्कार! कामरानं जिरवली'| Kunal Kamra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kunal Kamra

Kunal Kamra : 'दादासाहेब नव्हे तर मामासाहेब मोदी पुरस्कार! कामरानं जिरवली'

Kunal Kamra : बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी दोन दिवसांपासून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ब्रम्हास्त्रमधील भूमिकेसाठी रणबीरला गौरविण्यात आले.

काश्मीर फाईल्सला गेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आले होते. सोशल मीडियावर या बातम्या व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब पुरस्कार ज्या कलाकृतींना आणि कलाकारांना देण्यात आले ते त्या पात्रतेचे आहेत की नाही याविषयी चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. यात कुणाल कामराचे ट्विट लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

आपल्या परखड प्रतिक्रियांसाठी ओळखला जाणारा कुणाल कामरा सोशल मीडियावर चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. शट अप या कुणाल या कार्यक्रमातून त्यानं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याला इंस्टावर आणि युट्युबवर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. आता त्यानं दादासाहेब फाळके पुरस्कारावरुन दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय आहे.

काल तर दादासाहेब फाळके यांच्या नात त्यांनी देखील वेगळा खुलासा करुन धक्कादायक गोष्ट सांगितली होती. त्या म्हणाल्या, पैसे घेऊन या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे. एका मराठी अभिनेत्रीला देखील पैसे देऊन पुरस्कार देण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. यासगळ्यात कुणालची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

कुणालनं म्हटलंय की, कश्मिर फाईल्स प्रोपगंडा चित्रपटासाठी मामासाहेब मोदी पुरस्कार जिंकला आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी देखील या पुरस्कारावर तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.