VIDEO: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावल्यानंतर किंग खानचं मजेशीर भाषण; चाहत्यांना केलं 'खास' प्रॉमिस

दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यामध्ये (Dadasaheb Phalke Awards 2024) शाहरुखला जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
King Khan's hilarious speech after winning the Best Actor award
King Khan's hilarious speech after winning the Best Actor awardEsakal

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खास होतं. त्याचे जवान,पठाण आणि डंकी हे चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाले. हे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. अशातच काल पार पडलेल्या दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यामध्ये (Dadasaheb Phalke Awards 2024) शाहरुखला जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार जिंकल्यानंतर किंग खाननं एक मजेशीर भाषण केलं आहे. त्याच्या या भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाला शाहरुख?

पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख म्हणाला, "मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून बरीच वर्षे झाली. आता मला हा पुरस्कार मिळणार नाही असं वाटत होतं. पण मला हा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे."

पुढे शाहरुख म्हणाला, ""माझ्यापेक्षा विनोद चोप्राला पुरस्कार जास्त आवडतात. आम्ही दोघे ते शेअर करतो. मी माझ्या कामात घेतलेल्या मेहनतीचे लोकांनी कौतुक केले याचा मला खरोखर आनंद"

चाहत्यांना केलं प्रॉमिस

यावेळी शाहरुखनं चाहत्यांना एक प्रॉमिस केलं. तो म्हणाला, "पण कलाकाराच्या कामापेक्षा त्याच्या आजूबाजूला असणारे लोक महत्वाचे असतात. अनेकांनी मेहनत घेतली आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी अनेकांनी मला खूप मदत केली. खूप खूप धन्यवाद. मी वचन देतो की मी नेहमीच कठोर परिश्रम करीन. मी शक्य तितकी वर्षे भारतात आणि परदेशात राहणाऱ्या लोकांचे मनोरंजन करत राहीन.मी सतत मेहनत करत राहीन."

पाहा व्हिडीओ:

King Khan's hilarious speech after winning the Best Actor award
Dadasaheb Phalke Awards 2024: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा संपन्न; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

भाषणादरम्यान शाहरुखनं जवान या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. जवान या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपती यांनी काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com