दुसऱ्यांदा अनुभवणार 'डॅडीं'चा दरारा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पहिल्या चित्रपटाप्रमाणे 'दगडी चाळ 2'चं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे हे करतील. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.     

गँगवॉर वर आधारीत 'दगडी चाळ 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दगडी चाळ' या चित्रपटाला यश मिळालं होतं.

मराठी सिनेसृष्टीतही आता सुपरहिट चित्रपटांचा सिक्वेल बनवण्याची प्रथा हळूहळू रूढ होऊ लागली आहे. चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवाय या चित्रपटाचे आणखी एक वैशिट्य म्हणजे हा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे, त्या 'डॅडीं'ची कन्या योगिता गवळी या चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता 'दगडी चाळ 2' ही प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, यात शंकाच नाही.

अर्थात या चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी या चित्रपटाची निर्मिती संगीता अहिरच करणार आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणे 'दगडी चाळ 2'चं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे हे करतील. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dady Movie Part Two Coming Soon