
दगडी चाळीत रंगणार डब्बल 'कलरफुल' लव्हस्टोरी, पूजा सावंतचा रोमँटिक अंदाज..
daagadi chaawl 2 : 'दगडी चाळ २' ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार ? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. सूर्या सोनलला प्रेमाने 'कलरफुल' अशी हाक मारायचा, या चित्रपटानंतर पूजाला अजूनही त्याच नावाने ओळखले जाते. चित्रपटाच्या पहिल्या भागात या दोघांच्या जोडीला बरीच पसंती मिळाली होती. त्यामुळे 'दगडी चाळ २' मध्येही आपल्याला सूर्या आणि सोनल म्हणजे पूजा आणि अंकुशची भन्नाट आणि कलरफुल्ल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ २'मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर एका पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ म्हणत आहे तर अंशुमनही सूर्याला बिलगून ‘आय लव्ह यू डॅडी’ म्हणताना दिसत आहे. हे सुखी कुटुंब पाहता आता सूर्याने 'डॅडीं'ची साथ सोडली की, अजूनही सूर्या 'डॅडीं'चा उजवा हात आहे? हे 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच कळेल.मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती, चित्रपटातील इतर कलाकारांविषयी. ज्याचा उलगडा लवकरच होईल.
Web Title: Dagadi Chawl 2 Movie Cast Pooja Sawant Ankush Chaudhari Makarand Deshpande Release Date
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..