डॅडी विरुद्ध सूर्या..'दगडी चाळ २' मध्ये मोठा ट्विस्ट.. असं असेल कथानक..

बहुचर्चित 'दगडी चाळ २' या चित्रपटाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
dagadi chawl 2 big twist surya hate dady release date cast ankush chaudhari makarand deshpande
dagadi chawl 2 big twist surya hate dady release date cast ankush chaudhari makarand deshpandesakal

daagadi chaawl 2: काही वर्षांपूर्वी दगडी चाळीचा थरार दाखवणारा 'दगडी चाळ' चित्रपट आला होता. त्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता या चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'चुकीला माफी नाही' असं म्हणणाऱ्या अरुण गवळींचा ( Arun Gawli) म्हणजे डॅडींचा ( Daddy) दबदबा पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण पहिल्या भागात डॅडींच्या विश्वासात असलेला सूर्या, त्यांचा शब्द पाळणारा सूर्या 'दगडी चाळ २' मध्ये चक्क डॅडींच्या विरोधात जाताना दिसणार आहे. चित्रपटातील हा ट्विस्ट कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अंकुश चौधरीने याबाबतचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये 'I hate you DADY' असे लिहिले आहे.

(dagadi chawl 2 movie big twist surya hate dady ankush chaudhari shared poster i hate you dady release date cast makarand deshpande nsa95)

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं.

मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल.सूर्या हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे पोलिसांविषयी त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. पहिल्या भागात पोलीस आणि सूर्या यांच्यातील संवादही आपल्याला आठवत असेल. चौकशी दरम्यान एक पोलीस अधिकारी सूर्याला बोलतो, 'तू खूप साधा मुलगा आहे. हे एकही आहे ते खरखर सांग, आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहू' त्यामुळे हि त्याचीच तर झलक नाही ना.. की यापेक्षाही मोठा ट्विस्ट चाहत्यांना बघयला मिळणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com