Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला जामीन; पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daler Mehndi Bail News

Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला जामीन; पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

Daler Mehndi Bail News पंजाबी गायक दलेर मेहंदीला १९ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे दलेर मेहंदीला (Daler Mehndi) तुरुंगात जावे लागले होते. आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गायक दलेर मेहंदीला दिलासा (Bail) दिला. २००३ च्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती आहे.

हे १९ वर्षे जुने प्रकरण मानवी तस्करीशी संबंधित आहे. दलेर मेहंदीसोबत भाऊ समशेर सिंगही या प्रकरणात आरोपी होता. २०१७ मध्ये त्याचे निधन झाले. मार्च २०१८ मध्ये दलेर मेहंदी (Daler Mehndi) या प्रकरणात दोषी आढळला होता. त्यानंतर दलेर मेहंदीला आयपीसीच्या कलम ४२० आणि १२०-बी मध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

हेही वाचा: केआरकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका; नवे ट्विट, देशात सुरक्षित राहण्यासाठी...

हे सर्व २००३ मध्ये सुरू झाले. बक्षी सिंग नावाच्या व्यक्तीने पटियाला सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दलेर मेहंदी आणि भाऊ समशेर यांनी त्याला कॅनडाला पाठवण्यासाठी १३ लाख घेतल्याचा आरोप केला होता. परंतु, ना कॅनडाला पाठवले ना पैसे परत केले. बक्षी सिंहसोबत इतर ३० तक्रारकर्ते होते. ज्यांनी दलेर मेहंदीवर असे आरोप केले होते.

‘१५ लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र, १२ लाखांमध्ये सौदा ठरला होता आणि पैसेही देण्यात आले होते. त्यानंतर आणखी ५ लाखांची मागणी केली’ असा आरोप बक्षी सिंहने तक्रारीत केला होता. यानंतर तक्रारदाराने आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगून आणखी एक लाख दिले. तरीही दलेर मेहंदीने कॅनडाला पाठवले नाही. तसेच पैसे परत केले नाही. सोबतच ठार मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा: शर्वरी वाघचा वूलन टॉप, जीन्समध्ये फोटोशूट

शिक्षेला दिले होते आव्हान

पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला सुनावलेल्या शिक्षेविरुद्धच्या अपीलवर पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. १६ मार्च २०१८ रोजी पटियालाच्या ट्रायल कोर्टाने त्याला मानवी तस्करीच्या १९ वर्ष जुन्या प्रकरणात दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध दलेर मेहंदीने अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पटियाला यांच्यासमोर अपील दाखल करून आव्हान दिले होते.

पंजाब सरकारला नोटीस बजावली होती

चार वर्ष अपीलावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने १४ जुलै २०२२ रोजी दलेर मेहंदीचे अपील फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली होती. अपील फेटाळल्यानंतर दलेर मेहंदीने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान दिले. याचिकेत मेहंदीने अपील प्रलंबित असेपर्यंत आपल्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. दलेर मेहंदीची अपील आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Daler Mehndi Singer Bail Human Trafficking Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Punjabsingerbail