केआरकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका; नवे ट्विट, देशात सुरक्षित राहण्यासाठी...

केआरके चित्रपटांचे पुनरावलोकन करण्याऐवजी ट्विट करण्यावर भर देत आहे
KRK Latest News
KRK Latest NewsKRK Latest News

KRK Latest News कमाल आर खान उपाख्य केआरकेने (KRK ) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. कुठे तर ट्विटरवर. ट्विटरवर (Tweet) जोरदार पुनरागमन केल्यानंतर केआरके आता राजकारणात येण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे केआरकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका. केआरकेला राजकारणातील (Politics) प्रवेशाबद्दल काय म्हणायचे आहे ते जाणून घेऊया.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरके (KRK ) ट्विट करताना दिसत आहे. प्रथम त्याने सूड घेण्यासाठी आल्याचे सांगितले होते. नंतर ट्विट करीत त्याने तुरुंगात १० किलो वजन कमी झाल्याचे सांगितले. आता केआरकेने नवीन ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘लवकरच राजकारणात (Politics) प्रवेश करणार’ असे केआरकेचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

KRK Latest News
Casting couch : शमा सिकंदर कास्टिंग काउचवर स्पष्टच बोलली; तरुण निर्माते खूप...

‘मी लवकरच एका राजकीय पक्षात सामील होणार आहे. कारण, देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नाही तर नेता असणे गरजेचे आहे’ असे ट्विट करताना केआरकेने लिहिले आहे. तो लवकरच नेता बनणार आहे. मात्र, तो कोणत्या पक्षाचा भाग होणार आहे, याचा खुलासा केलेला नाही. स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणारा केआरकेला नेता बनताना पाहणे वेगळाच अनुभव असेल.

ट्विट करण्यावर भर

केआरकेच्या अटकेनंतर करण जोहरमुळे अटक झाल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, केआरकेने (KRK) ताज्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की त्याच्या अटकेचा करण जोहर, शाहरुख, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्याशी काहीही संबंध नाही. केआरके तुरुंगातून बाहेर आल्यापासून चित्रपटांचे पुनरावलोकन करण्याऐवजी ट्विट करण्यावर भर देत आहे. आता केआरके कोणत्या राजकीय पक्षात जातो हेच पाहायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com