esakal | Dance Deewane Season 3; पोटासाठी रोज टॉयलेट साफ करावं लागतयं

बोलून बातमी शोधा

 dance ke deewane season 3 contestant Rahul Solanki story astonished judges  }

8 फेब्रुवारीपासून डान्स इंडिया डान्सचा तिसरा सीझन सुरु झाला आहे. त्यात ऑडिशन देण्यासाठी राहूल सोळंकी नावाचा एक स्पर्धक आला होता.

manoranjan
Dance Deewane Season 3; पोटासाठी रोज टॉयलेट साफ करावं लागतयं
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  त्याचा डान्स पाहून परिक्षक थक्क झाले होते. त्याचा परफॉर्मन्स सॉलिड होता. सोशल मीडियावर ज्य़ावेळी त्याच्या डान्सच्या क्लिप व्हायरल होत होत्या तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता. मात्र स्पर्धेत सहभागी होऊन त्याला मोठं व्हायचं आहे. आपण ज्या गरिबीतून जात आहोत त्यापासून दूर आणखी चांगलं आयुष्य त्याला जगायचे आहे. त्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. डान्स दिवानेच्या तिस-या सीझनमधील त्या स्पर्धकानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

28 फेब्रुवारीपासून डान्स इंडिया डान्सचा तिसरा सीझन सुरु झाला आहे. त्यात ऑडिशन देण्यासाठी राहूल सोळंकी नावाचा एक स्पर्धक आला होता. तो मुंबईतील एका चाळीत टॉयलेट साफ करतो. त्याची ही विदारक कहाणी ऐकून परिक्षक सुन्न झाले होते. तसेच त्या शोमध्ये उपस्थित असणा-यांनाते मन हेलावून गेले होते. बिग बॉसचा 14 वा सीझन संपल्यानंतर आता डान्स दिवाने सीझन 3 ला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांना या कार्यक्रमाकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीक वापरत आहेत. मात्र यासगळ्यात राहूल सोळंकीची कहाणी सर्वांना थक्क करणारी होती.

त्या शो चा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोमध्ये असे दाखिवण्यात आले आहे की, मुंबईतील एका चाळीत राहणारा गुजराती परिवारात वाढलेला राहुल हा दररोज आसपासच्या आठ चाळींमधील कचरा गोळा करतो. त्यानंतर त्या भागातील 51 सार्वजनिक शौचालयाची साफसफाई देखील करतो. या कामी तो त्याच्या वडिलांना मदत करतो. त्याचे वडिल जेव्हा साफसफाऊ साठी एखाद्या नाल्यात उतरतात तेव्हा त्याला ते आवडत नाही.

राहुलचं एक स्वप्न आहे ते म्हणजे त्याला आपल्या कुटूंबाला एका मोठ्या घरात घेऊन जायचे आहे.  28 फेब्रुवारीला राहुलनं डान्स दिवाने च्या तिस-या सीझनसाठी ऑडिशन दिले होते. तो त्याच्या डान्समुळे सिलेक्टही झाला होता. मात्र जेव्हा त्याची कथा सगळ्यांनी ऐकली तेव्हा परिक्षक धर्मेश येलांडेला आपले जुने दिवस आठवले. तो म्हणाला, माझे वडिल आजही चहाचे दुकान चालवतात. त्याने राहुलला सांगितले की, कुठलेही काम हे छोटे किंवा मोठे नसते. आपण ते कसे करतो हे महत्वाचे.