Sanya Malhotra
Sanya Malhotrasakal

Sanya Malhotra: 'दंगल' अभिनेत्री सान्या मल्होत्राने खरेदी केले नवीन घर, फोटो होतायेत व्हायरल

सध्या सान्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. तिने नवीन घर घेतले आहे.

2016 मध्ये आमिर खानच्या दंगल या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी सान्या मल्होत्रा ​​आता अनेकदा चर्चेचा भाग असते. सध्या सान्या तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. तिने नवीन घर घेतले आहे.

सान्या मल्होत्राने नवीन घरात गृहप्रवेशही केला आहे. यावेळी तिने पूजा केली. आता गृहप्रवेश पूजेचे अनेक फोटो समोर आले आहेत, जे सान्यानेच चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली.

सान्याने स्टोरीमध्ये स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोक्यावर कलश घेऊन घरात प्रवेश करताना दिसत आहे. हाऊस वॉर्मिंग समारंभासाठी अभिनेत्रीने एक सुंदर आऊटफिट निवडला, ती प्रिंटेड ब्लाउजसह पांढरी साडी नेसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘नवीन घर’ असे कॅप्शन दिले आहे.

Sanya Malhotra
Sreenivas Bellamkonda: रश्मिकासोबतच्या डेटिंगच्या अफवांवर श्रीनिवास बेल्लमकोंडाने सोडले मौन, अभिनेत्याने सांगितलं सत्य

या फोटोंशिवाय पूजेदरम्यानचे अनेक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये घरात एका ठिकाणी भगवान शंकराची मूर्तीही बसवलेली दिसत आहे. याआधी 2021 मध्ये सान्याने जुहूमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. त्या काळातही ती खूप चर्चेत होती. मात्र, अभिनेत्रीच्या या नवीन घराच्या किमतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Sanya Malhotra
Sanya Malhotra Sakal
Sanya Malhotra
Sanya Malhotra sakal

सान्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती दंगलमध्ये बबिताच्या भूमिकेत दिसली होती. त्या चित्रपटातून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. सान्या पंकज त्रिपाठीच्या लुडो चित्रपटातही दिसली होती. याशिवाय ती 'हिट: द फर्स्ट केस' या चित्रपटातही दिसली, ज्यामध्ये राजकुमार राव होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com