esakal | 'आंबे खायला आवडतात का ऐवजी रात्री शांत कसे झोपता ?' दंगल गर्ल झायराचा पंतप्रधानांवर आणि अक्षयवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

 'आंबे खायला आवडतात का ऐवजी रात्री शांत कसे झोपता ?' दंगल गर्ल झायराचा पंतप्रधानांवर आणि अक्षयवर निशाणा

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता दंगल गर्ल झायरा वसीम हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधलाय

'आंबे खायला आवडतात का ऐवजी रात्री शांत कसे झोपता ?' दंगल गर्ल झायराचा पंतप्रधानांवर आणि अक्षयवर निशाणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता दंगल गर्ल झायरा वसीम हिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता अक्षय कुमारवर निशाणा साधलाय..गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेता अक्षय कुमारने मोदी यांची घेतलेली मुलाखत चांगलीच व्हायरल झाली होती..या मुलाखतीत मोदींना त्यांच्या राजकीय प्रवासासोबतंच त्यांच  बालपण, विरोधकांसोबतचं नातं आणि खासकरुन त्यांना आंबे खायला आवडतात का ? हा प्रश्नसुद्धा अक्षयने विचारला होता.

 या प्रश्नाचा संदर्भ घेत झायराने मोदी आणि अक्षय कुमार या दोघांनाही टोमणा मारलाय..झायराने ट्वीट करत,'तुम्ही आंबे कसे खाता याऐवजी तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागते हा प्रश्न विचारायला हवा होता' असं म्हटलंय..

 दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन(सीएए) आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होताना पाहायला मिळालंय...यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीवही गमवायला लागलाय..या हिंसाचाराविरोधात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत..

कॉम्प्युटर शिकवायच्या नावाने यायचा आणि मुलींशी करायचा असं काही...

त्यातंच आता झायराने थेट मोदींना टोला लगावल्याने सर्वांचं लक्ष झायराकडे लागून आहे...झायराने या क्षेत्रामुळे मी माझ्या धर्मापासून लांब जात असल्याचं कारण देत अभिनयाला राम राम ठोकलाय..मात्र अशा अनेक सामाजिक मुद्दयांवर ती आपलं मत जाहीरपणे मांडताना दिसून येते..


dangal girl zaira wasim comment on prime minister narendra modi statememnt

loading image
go to top