गोवा चित्रपट महोत्सवात 'दशक्रिया' हाऊसफुल्ल !

टीम इ सकाळ
गुरुवार, 22 जून 2017

पणजी : नुकत्याच संपन्न झालेल्या '१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित 'दशक्रिया' या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या महोत्सवात  दर्दीप्रेक्षक, आणि मान्यवरांसोबतच गोयंकरांचे लक्ष वेधत 'दशक्रिया'ने हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवीत बाजी मारली. या महोत्सवाला मनोज जोशी, अभिनेत्री - निर्माती कल्पना विलास कोठारी, अभिनेत्री उमा सरदेशमुख, आशा शेलार, अदिती देशपांडे, 'रंगनील'चे नील कोठारी इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

'दशक्रिया' या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ राज्य शासन पुरस्कार, ४ संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि २ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये  पुरस्कार असे सन्मान मिळविले आहेत. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या ९व्या 'निफ' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तब्बल १३ विभागांमध्ये नामांकनं जाहीर झाली आहेत.

दशक्रिया' चित्रपटाला 'जोगवा', 'पांगिरा', '७२ मैल एक प्रवास' सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक - प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांचे पटकथा, संवाद, गीत लेखन लाभलं असून जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची 'दशक्रिया' ही बहुचर्चित साहित्यकृती, संदीप भालचंद्र पाटील यांचं दिग्दर्शन आणि सोबतीला अनुभवी सकस कलावंत तंत्रज्ञांची फौज या जमेच्या बाजूंमुळे 'दशक्रिया'चा कॅनवास अधिक फुलून आला आहे.

या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, पंकज चेंबूरकर, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, अभिजित झुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर, कैवल्य पिसे, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर, कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dashakriya housefull in goa esakal news