गजेंद्रचा "डीअर मॉली' ऑस्करच्या स्क्रिनिंगसाठी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा "डीअर मॉली' हा चित्रपट ऑस्करच्या परीक्षकांसमोर स्क्रिनिंगसाठी निवडण्यात आला आहे. लॉस एन्जलिस येथे डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा "डीअर मॉली' हा चित्रपट ऑस्करच्या परीक्षकांसमोर स्क्रिनिंगसाठी निवडण्यात आला आहे. लॉस एन्जलिस येथे डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

स्क्रिनिंगनंतर निवड झाल्यास ऑस्करच्या अंतिम मानांकनासाठी चित्रपटाची निवड होईल. हा चित्रपट इंग्रजी भाषेतच असल्याने "मेनस्ट्रीम सिनेमा' श्रेणीसाठी त्याची निवड झाली होती. आता ऑस्करच्या 14 विभागांसाठी त्याचे स्क्रिनिंग होणार आहे.

आपल्या वडिलांच्या शोधात असणाऱ्या मुलीची कथा चित्रपटात आहे. मॉली ही पाच वर्षांची असताना तिचे वडील तिला सोडून निघून जातात. त्यांनी तिच्यासाठी लिहिलेल्या पत्रांवरून ती त्यांचा शोध घेत असते. इंडो-स्वीडिश यांच्या संयोगाने हा चित्रपट बनविण्यात आला आहे. अभिनेत्री गुर्बानी गिल मॉलीच्या भूमिकेत आहे. आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले आणि अश्‍विनी गिरी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ऑस्कर मानांकनाच्या अंतिम टप्प्यात "डीअर मॉली'ची निवड झाल्याबद्दल गजेंद्र अहिरे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, की मला ऑस्करसाठी एवढ्या पुढच्या टप्प्यात माझा चित्रपट पोहोचला, याचा खूप आनंद आहे. चित्रपटाला मानांकन मिळेल की नाही माहीत नाही; पण आपण त्या दर्जाचे काम करू शकतो, याचे समाधान मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dear Molly Movie Select for Oscar