Debina: सात महिन्यातच दुसऱ्या बाळाची आई झाली म्हणत रंगली चर्चा; पोस्ट शेअर करत देबिनानं सांगितलं कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Debina Bonnerjee

Debina: सात महिन्यातच दुसऱ्या बाळाची आई झाली म्हणत रंगली चर्चा; पोस्ट शेअर करत देबिनानं सांगितलं कारण..

Debina's New Baby Girl: सितेच्या भूमिकेसाठी आजही ओळखली जाणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिनाने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सात महिन्यातच अभिनेत्रीने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. मात्र देबिना आणि गुरमीतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याचं कारणही सांगितलं आहे.

११ नोव्हेंबरला गुरमित आणि देबिना एका गोंडस कन्येचे आई-बाबा झालेत. गुरमीत आणि देबिनाने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत 'इट्स अ गर्ल' म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी वेळेआधीच बाळाचे आगमन झाल्याबाबतही सांगितले आहे. अर्थात वेळेआधीच बाळ झाल्याने देबिना आणि गुरमित सात महिन्यात दुसऱ्या बाळाचे पालक झाले आहेत.

या दोघांच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर गुरमीत-देबिनाने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. एप्रिलमध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा गुरमीत-देबिनाच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. दुसऱ्यांचा गरोदर असलेल्या देबिनाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.