डिसेंबर महिना 'फुल्ल टू Entertainment'; या सीरिज होणार रिलिज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 डिसेंबर महिना 'फुल्ल टू Entertainment'; या सीरिज होणार रिलिज
डिसेंबर महिना 'फुल्ल टू Entertainment'; या सीरिज होणार रिलिज

डिसेंबर महिना 'फुल्ल टू Entertainment'; या सीरिज होणार रिलिज

मुंबई - मनोरंजन विश्वातून प्रेक्षक आणि चाहते यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. ती म्हणजे पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणावर चित्रपट, मालिका, सीरिज प्रदर्शित होणार आहे. ओटीटीचा पर्याय उपलब्ध झाल्यानं निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे रखडलेल्या प्रोजेक्टला स्क्रिन मिळत आहेत. ऑनलाईन मीडियावर ते व्हायरल होत आहेत. यामुळे निर्माते जे आर्थिक कोंडीत सापडले होते त्यांची कोंडी दूर झाली आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या मालिका आणि चित्रपटाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

मनी हाईस्ट - सीझन 5

जगभरात लोकप्रिय झालेली वेबसीरिज आता नेटफ्लिक्सवर 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या मालिकेतील पाच एपिसोड प्रदर्शित झाले होते. तेव्हापासून या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

इनसाइड एज सीजन 3

तीन डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर या लोकप्रिय मालिकेचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. क्रिकेट आणि त्याभोवती रंगणारे राजकारण यावर ही मालिका भाष्य करते. या सीरिजमध्ये विवेक ऑबेरॉय, रिचा चढ्ढा आणि आमीर बशीर सारखे कलाकार आहेत.

आर्या 2 -

10 डिसेंबरला बहुचर्चित आर्या 2 मालिका प्रसिद्ध होणार आहे. गेल्या वर्षी या मालिकेचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेबसीरिजमध्ये सुष्मितानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

* द विचर सीजन 2

नेटफ्लिक्सवर अॅक्शन सीरिज द विचरचा 2 रा सीझन 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या भागाला भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. या भागामध्ये हेन्री केविल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

* लॉस्ट इन स्पेस 3

सायन्स अँड फिक्शन प्रकारातील लोकप्रिय मालिका लॉस्ट इन स्पेसचा तिसरा सीझन डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला सीझन हा 2018 तर दुसरा सीझन 2019 मध्ये आला होता.

* एमिली इन पँरिस सीजन 2

या रोमँटिक कॉमेडी ड्रामा सीरिजचा दुसरा सीझन 22 डिसेंबर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्या सीरिजमध्ये लिली कोलिंस एमिली मुख्य भूमिका साकारणार आहे.

loading image
go to top