Deepa Parab: आजवर मी गप्प होते, कारण.. अखेर 'महाराष्ट्र शाहीर'बाबत अंकुशची बायको दीपा बोललीच..

महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहून अंकुश चौधरीची बायको दीपा परबची पहिली प्रतिक्रिया..
Deepa Parab shared emotional post for ankush chaudhari after watching maharashtra shaheer shahir movie
Deepa Parab shared emotional post for ankush chaudhari after watching maharashtra shaheer shahir movie sakal

Actress Deepa parab chaudhari shared post for ankush chaudhari : झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दीपाने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा मालिकेतून पदार्पण केले आहे. सध्या तिच्या भूमिकेची बरीच चर्चा आहे.

ती सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. अनेक फोटो, आपले अपडेट ती शेयर करत असते. त्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. पण तिचा पती म्हणजे अंकुश चौधरीचा 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले तरी दीपाने त्याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती.

अंकुश च्या चित्रपटावर दीपाची काय भावना असेल यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दीपा परब-चौधरी हिने 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाबाबत आणि अंकुशच्या भूमिकेबाबत एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

'(Deepa Parab shared emotional post for ankush chaudhari after watching maharashtra shaheer shahir movie )

Deepa Parab shared emotional post for ankush chaudhari after watching maharashtra shaheer shahir movie
Maharashtra Din: 'त्या'वेळी शाहीरांचा डफ कडाडला आणि महाराष्ट्र रातोरात पेटून उठला..

'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट पाहून दीपाला नेमकं काय वाटलं हे तिने या पोस्ट मध्ये लिहिलं आहे. दीपा म्हणते, ''आज १ मे, महाराष्ट्र दिन… २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरंतर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पुर्णतः निःशब्द झाले आहे.''

''चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली.''

''बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले.''

पुढे ती म्हणते, ''ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्यांनी घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे.''

''चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाही आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे. अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचं यश आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी महाराष्ट्रतील सर्व रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहण्याची मी विनंती करते.'' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे तर प्रमुख भूमिकेत म्हणजेच शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून सध्या तूफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com