दिपाली सय्यदचा राज ठाकरेंना टोला, मोदींची मदत घ्यावी, म्हणजे..

पंतप्रधान नरेंद्र माेदींनंतर दिपाली सय्यने राज ठाकरे यांच्यावर निषाणा साधला आहे.
deepali sayyed on raj thackeray
deepali sayyed on raj thackeray sakal

Deepali sayyad : अभिनेत्री सोनाली सय्यद सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनयासोबतच राजकारणाची वाट निवडलेल्या सोनाली सय्यद हिने पक्ष कार्यात अक्रिय सहभाग घेतला आहे. नुकतेच तिन मोदींच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली होती. या घटनेचं समर्थन करताना त्या म्हणाल्या होत्या की,'जर या कारमध्ये सोमय्यांऐवजी पंतप्रधान मोदी जरी असते तरी ती कार शिवसैनिकांनी फोडली असती.' या विधानावरुन मोठा वादंग झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सोनालीने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.

deepali sayyed on raj thackeray
'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट

किरीट सोमय्या प्रकरणात दिपाली सय्यद म्हणाली होती "त्यावेळची परिस्थितीच तशी होती. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. जो नडला त्याला फोडला हीच बाळासाहेबांची शिकवण आहे. त्या ठिकाणी जर मोदीजींची देखील गाडी असली असती तर तीही फोडली गेली असती." (Dipali Sayyad Latest Marathi News) गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली विचारधारा हिंदुत्वाकडे झुकवली आहे. त्यांच्या भाषणातूनशी मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर सडकून टिका होत आहे. शिवसेनेच्या दिपली सय्यद हीने नुकतेच एक ट्विट केले आहे.

यावेळी तिने राज ठाकरे यांच्यावर निषाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदींना तना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही.' असे ट्विट दिपाली सय्यदने केले आहे. (deepali sayyed says, 'raj thackeray who is fighting hard to please Modi, should seek Modi's advice and help for his visit to Ayodhya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com