'या' दोघांमध्ये फसली दीपिका पदुकोण!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 April 2019

रणवीर सिंगला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि दुसरीकडे अनीशा पदुकोणलाही आपल्या दीदीचा सहवास हवा होता. मग काय, दीपिका पदुकोण मात्र या दोघांमध्ये फसली.

बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. पण तरीही फॅमिली सोबत थोडा निवांत वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करुन यांनी फॅमिली टाईम सेलिब्रेट केला आहे. 

रणवीर सिंगला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि दुसरीकडे अनीशा पदुकोणलाही आपल्या दीदीचा सहवास हवा होता. मग काय, दीपिका पदुकोण मात्र या दोघांमध्ये फसली. दीपिकाने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्या फोटोत ती पती रणवीर आणि लहान बहीण अनीशा यांच्या मध्ये फसली असल्याचे दिसत आहे. तरी तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. या फोटोला कॅप्शन देत दीपिका म्हणतेय, 'मी तर या दोघांमध्ये फसली.'

दीपिकाने हा फोटो सोशल मिडीयावर शेअर करताच खूप व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी पेक्षा अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. अलीकडेच 'छपाक'चे पहिले शेड्यूल पूर्ण करुन दीपिका दिल्लीवरून मुंबईला परतली. रणवीरही '83' या चित्रपटात बिझी आहे. यात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

cuddles & snuggles! smashed in the middle! @ranveersingh @anishapadukone

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone cuddles and snuggles with Ranveer Singh sister Anisha in Instagram post