esakal | 'दीपवीर'च्या मुंबईतील रिसेप्शनला गोल्डन साज
sakal

बोलून बातमी शोधा

'दीपवीर'च्या मुंबईतील रिसेप्शनला गोल्डन साज

दिपवीर 1 डिसेंबरला मुंबईत अजून एक रिसेप्शन देणार आहे. हे रिसेप्शन फक्त बॉलिवूडमधील कलाकार आणि मित्रमंडळींसाठी असणार आहे. या दोघांचा विवाह इटलीतील लेक कोमो शहरात थाटामाटात पार पडला होता.

'दीपवीर'च्या मुंबईतील रिसेप्शनला गोल्डन साज

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : इटलीतील स्वप्नवत लग्नसोहळ्यानंतर बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनमध्ये दोघांनी सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली होती.

हा सोहळा रणवीरच्या परिवाराकडून आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रणवीरचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली. लग्नासाठी ठरविलेल्या पांढऱ्या थिमनुसारच त्यांनी पेहराव केले होते. मात्र, लग्नानंतरच्या रिसेप्शनमध्ये गोल्डन थीम ठेवण्यात आली. बंगळूरमधील रिसेप्शनमध्ये दीपिकाने गोल्डन साडी परिधान केली होती. या रिसेप्शनमध्येही दोघांनीही भरजरी आणि नाजूक नक्षीकाम केलेली वस्त्रे परिधान केली होती. 

दिपवीर 1 डिसेंबरला मुंबईत अजून एक रिसेप्शन देणार आहे. हे रिसेप्शन फक्त बॉलिवूडमधील कलाकार आणि मित्रमंडळींसाठी असणार आहे. या दोघांचा विवाह इटलीतील लेक कोमो शहरात थाटामाटात पार पडला होता.

loading image