एनसीबीच्या समन्सवर समोर आली दीपिका पदूकोणची प्रतिक्रिया

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 24 September 2020

इंडस्ट्रीतील चार अभिनेत्रींना आत्तापर्यंत समन्स पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दीपिका पदूकोणच्या नावाचा देखील समावेश आहे. अशातंच आता दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी या जाळ्यात सापडताना दिसतायेत. एनसीबी जस जसा त्यांचा तपास पुढे नेत आहे तस तशी सेलिब्रिटींची लिस्ट वाढतंच चालली आहे. इंडस्ट्रीतील चार अभिनेत्रींना आत्तापर्यंत समन्स पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दीपिका पदूकोणच्या नावाचा देखील समावेश आहे. अशातंच आता दीपिकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.  

हे ही वाचा: दीपिका पाठोपाठ आता सारा अली खान देखील गोव्याहून मुंबईला रवाना, मिडियाला पाहुन फिरवली पाठ

दीपिका पदूकोणला तिचा जबाब नोंदवण्यासाठी २५ सप्टेंबरला बोलवण्यात आलं आहे. दीपिकासोबतंच उद्या रकुलप्रीत सिंहला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. तर श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना २६ सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार दीपिकाने समन्सला उत्तर देत म्हटलं आहे की 'मी तपासात सहकार्य करेन.'  असं असलं तरी दीपिकाने तिच्या कोणत्याही अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

दीपिका चार्टर्ड विमानाने गोव्याहुन मुंबईला पोहोचणार होती मात्र आता दीपिकाने तिचा रस्ता बदलला असून ती हायवे मार्गे मुंबईला पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे. दीपिका दुपारी १२.३० वाजता गोव्याहून निघणार असं म्हटलं जात होतं मात्र अजुनही दीपिका मुंबईत पोहोचलेली नाही. हायवे मार्गे गोव्याहून मुंबईत येण्यासाठी ८ ते ९ तास लागू शकतात. मात्र याबाबत अजुनही ठोस माहिती समोर आलेली नाही. 

याव्यतिरिक्त वरिष्ठ अधिका-यांनी सांगितलं की या प्रकरणात टॅलेंट मॅनेजर जया साहाने अनेक महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. याआधी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशला देखील चौकशीसाठी बोलवलं गेलं होतं मात्र तिने तब्येतीचं कारण देत मुदत वाढवून मागितली आहे. तिला शुक्रवार पर्यंतची मुदत मिळाली आहे. एनसीबीच्या सुत्रांनुसा करिश्मा प्रकाशच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये ड्रगशी संबंधित बातचीत समोर आली आहे.   

deepika padukone confirms she will be appearing before ncb for questioningas per reports


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone confirms she will be appearing before ncb for questioning as per reports