बाजारात फिरत होती दीपिका तरीही कोणी ओळखलचं नाही, पाहा व्हिडीओ !

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दीपिका सध्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. लग्नानंतर दीपिका पहिल्यांदाच या चित्रपटातून दिसणार आहे. दरम्यान दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जाणून घ्या काय आहे या व्हिडीओमध्ये !

मुंबई : लक्ष्मी अग्रवालच्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्देवी अशी होती. मात्र त्यातून सावरुन ज्या जिद्दीने ती उभी राहिली. ते बघता लक्ष्मी आज संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणास्थान आहे. ऍसिड हल्ल्यामुळे चेहऱ्यावर झालेल्या जखमा हा अपंगत्वाचा भाग नाही. आज जरी ती आर्थिकदृष्ट्या सबळ नसली तरी त्यातून ती मोठ्या हिमतीने उभी राहिली.समाजात आजही अनेक लक्ष्मी आहेत. तिचा आजवरचा लढा "छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आणत आहोत. असं दीपिकाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये म्हटलं. दीपिका सध्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. 

लग्नानंतर दीपिका पहिल्यांदाच या चित्रपटातून दिसणार आहे. दरम्यान दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या IGTV व्हिडीओमध्ये ती 'छपाक' मधील  ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या मालतीच्या रुपामध्ये दिसते आहे. याच रुपामध्ये ती सामान्य मुलीप्रमाणेच बाजारात फिरते. इतर ऍसिड विक्टीमसोबत ती फिरताना दिसते. 

ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन यामध्ये दाखविला गेला आहे. अनेकजण अगदी मोकळेपणाने हसत-खेळत तिच्याशी बोलत आहेत. पण काही जणांनी तिच्याशी बोलणेच टाळले. मालतीसारखाच मेकअप करत ती या व्हिडीओमध्ये दिसते आणि बाजारात फिरते. त्यामुळे दीपिकाला कोणी ओळखू शकले नाही. य़ा व्हिडीओच्या अखेरीस दीपिका सर्वांनाच एक आवाहन करते. एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे असं ती सांगते. 

'छपाक' चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाणी रिलिज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता अधिक वाढली आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शन केलं असून येत्या 10 जानेवारीला तो चित्रपटगृहात दाखल होइल. या व्हिडीच्या मार्फत दीपिकाने अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika padukone experiment video of social awareness