esakal | दीपिका पदुकोणचे वडील रुग्णालयात दाखल; आई आणि बहीणसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone Family
दीपिका पदुकोणचे वडील रुग्णालयात दाखल; आई आणि बहीणसुद्धा कोव्हिड पॉझिटिव्ह
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॅडमिंटनपटू आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचे Deepika Padukone वडील प्रकाश पदुकोण Prakash Padukone यांना कोरोनाची लागण झाली. बेंगळुरूमधील रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू आहेत. ६५ वर्षीय प्रकाश पदुकोण हे उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Deepika Padukone father Prakash Padukone hospitalised for Covid 19 treatment)

"दहा दिवसांपूर्वी प्रकाश यांची पत्नी उज्ज्वला आणि दुसरी मुलगी अनिशा यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोनाची चाचणी केली असता त्या दोघींचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला", अशी माहिती प्रकाश पदुकोण यांचे जवळचे मित्र विमल कुमार यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली. "त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं मात्र आठवड्याभरानंतरही प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे गेल्या शनिवारी त्यांना बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता ठीक असून पत्नी आणि मुलगी घरीच आहेत. प्रकाश यांना पुढील दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे", असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा : 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीच्या २९ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन