अर्रर्र...दीपिकानेच केला रणवीरचा पत्ता कट!नवरा-बायकोत नेमकं झालं काय? Deepika Padukone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh, Deepika Padukone

अर्रर्र...दीपिकानेच केला रणवीरचा पत्ता कट!नवरा-बायकोत नेमकं झालं काय?

दीपिका पदूकोण(Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली तरी हे मात्र आजही लव्हबर्ड्स म्हणूनच मिरवत आहे. म्हणजे संसारात दोघेही चांगले रमलेले आहेत म्हणायचं. गेल्याच महिन्यात दोघांनी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. ज्यासाठी दोघांनीही उत्तराखंड गाठलं होतं. तिथले रोमॅंटिक हॉलिडेचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. आता हे दोघेही एकमेकांच्या फोटोवर,पोस्टवर,व्हिडीओवर व्यकत होतात. रणवीर जरा याबाबतीत एक पाऊल पुढे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्या कमेंट्सही वाचण्यासारख्या असतात. आता येऊया मुळ मुद्दयावर. दीपिकानं रणवीरचा पत्ता कट केला म्हणजे नेमकं काय केलंय ते जाणून घेण्यासाठी.

हेही वाचा: सोहानं पाठवलं दिवंगत वडिलांना वाढदिवसाचं अनोख गिफ्ट;म्हणाली,'अब्बा...'

तर दीपिकानं आपल्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो एकत्रित करून पोस्ट केले आहेत. ज्या पोस्टला तिनं कॅप्शन दिलंय की,''२०२१ मधील मला आवडलेल्या गोष्टींची ही फोटो सिरीज. आय लव्ह फूड,फोटो,ट्रॅव्हल...'' आता ही फोटो सिरीज पहाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत रणवीरसोबतचा तिचा किंवा फक्त रणवीरचा असा एकही फोटो नाहीय. तिनं स्वतःचा सेल्फी, चहा-बिस्कीट,लाल गुलाबांची फुलं,फ्लाइटमधनं दिसणारं विहंगम दृश्य,खोल दरी,रस्ते,चक्क एका टी-शर्टचा ही फोटो सिरीजमध्ये सामिल केलाय. पण कुठेच रणवीरची झलक नावालाही दिसली नाही. यावरनं बिचा-या रणवीरचं मात्र मन खट्टू झालंय.

रणवीरनं लगेच बायकोच्या पोस्टवर कमेंटही केलीय,''अर्रर्र'...माझा नंबर नाही लागला वाटतं''. पण त्याच्या या कमेंटवर एकच हशा पिकलाय. त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय,'जिजाजी...तुमच्यासाठी खास वेगळी पोस्ट नक्कीच करेल दीपिका ताई'. तर एकाने लिहिलंय,'मी तुझाच फोटो त्या सिरीजमध्ये शोधत होतो'. तर एकाने लिहिलंय,'विसरली असेल'. पण नंतर म्हटलं की,'अरे तिनं तिला आवडणा-या गोष्टी म्हटलंय,माणसं नाहीत'. आता चाहत्यांनी नानाप्रकारे रणवीरचं सांत्वन केलंय खरं. पण आता पहायचं दीपिका नाराज रणवीरला कसं मनवतेय ते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top