
Deepika Padukone In FIFA: सध्या जगभरात दोनच गोष्टींची चर्चा आहे, एक म्हणजे कतार मध्ये झालेला फिफा वर्ल्ड कप आणि त्या ट्रॉफीचे अनावरण करणारी अभिनेत्री दीपिका पदूकोण. कालच्या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली असली तरी खऱ्या अर्थाने दीपिकाच जास्त चमकत आहे. यावेळी अभिनेत्रीने दीपिका पदुकोणने फिफा विश्वचषक 2022 ची ट्रॉफी लाँच करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यावेळी दीपिकाचा लुक, तिची फॅशन तिचे कर्तृत्व या साऱ्याचीच बक्कळ चर्चा झाली. पण याच निमित्ताने आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत.. ती म्हणजे दीपिकाच्या डिप्रेशनची..
आज डिप्रेशन ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. याचा तरुणांना मोठा फटका बसत आहे. पण डिप्रेशन ही काही सामन्यांचीच समस्या नाही तर मोठ्या सेलिब्रिटींनाही या समस्येला सामोरं जावं लागलं आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण.
एकसोएक लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या दिपिकालाही डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातून तीने शिताफिने बाहेर येत ग्रेसफेल आयुष्य जगण्याचा संकल्प केला. त्यामुळे डिप्रेशन आलं तर कशी मात करायची हे दिपिकाकडून बघणं गरजेचं आहे.
२०१२ सालापासून ३ वर्ष ती डीप्रेशनचा सामना करत होती. आता आपलं आयुष्य संपलं अशी भावना सातत्याने तिच्या मनात येत होती. पण 2015 मध्ये ती यातून बाहेर पडली. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'तो माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. जेव्हा मी त्या काळात होतो, तेव्हा माझ्या आईला माझ्यामध्ये नैराश्याची लक्षणे दिसली. तिने मला योग्य ट्रिटमेंट घेण्याचा सल्ला दिला. माझ्या आईने काउन्सिलर नेमला. मला साथ दिली नसती तर मी इतक्या लवकर बरी झाले नसते.'
पुढे ती म्हणाली, 'जेव्हा तुम्हाला डिप्रेस वाटेल किंवा डिप्रेशनमध्ये चाललो आहोत असे वाटेल तेव्हा योग्य ट्रीटमेंट, मेडिटेशन आणि जवळच्या लोकांशी गोष्टी शेअर करणे विसरू नका,'
''तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करायला येत असेल तर तीचा आधार घ्या आणि झोकून द्या स्वत:ला. मी मोठी होत होते, तेव्हा वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की, सर्वोत्तम होण्यासाठी, शिस्त, समर्पण आणि दृढनिश्चय (डिसीप्लिन, डेडिकेशन, डिटरमिनेशन) हे तीन 'डी' महत्वाचे आहेत. आपल्या मनाचे एकून जे योग्य वाटेल ते करा.. मीही हेच केले आणि डिप्रेशनमधून बाहेर पडले.'' असे दीपिका म्हणाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.