Deepika Padukone Net Worth : दीपिका पती रणवीर पेक्षाही श्रीमंत; करोडोंची आहे मालकीण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone And Ranveer Singh

Deepika Padukone Net Worth : दीपिका पती रणवीर पेक्षाही श्रीमंत; करोडोंची आहे मालकीण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. 2007 मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केल्यानंतर तिने जगभरात खूप नाव कमावले. नावासोबतच दीपिकाने तिच्या करिअरमध्ये बरीच संपत्तीही कमावली आहे. आज तिला कशाचीही कमतरता नाही. रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणकडे तिचा पती रणवीर सिंहपेक्षा जास्त संपत्ती आहे. आज 5 जानेवारीला दीपिका पदुकोणचा वाढदिवस आहे, ती तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया.

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रिपोर्ट्समध्ये तिच्याबद्दल सांगण्यात आले आहे की, दीपिका एका चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी फी घेते. तीच फी तिने पठाणसाठीही घेतल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटांसोबतच दीपिका ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. रिपोर्ट्सनुसार, ती ब्रँडच्या जाहिरातीसाठी 7 ते 10 कोटी रुपये फी घेते, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एंडोर्समेंटसाठी ती 1.5 कोटी रुपये घेते.

हेही वाचा: Deepika Padukone Birthday: सुपर हॉट दीपिका 'हार्ट अरिथमिया'ने आहे त्रस्त.. काय आहे हा आजार?

दीपिका पदुकोणचे मुंबईत स्वतःचे वैयक्तिक 4 BHK आलिशान घर आहे. रिपोर्ट्समध्ये या घराची किंमत 16 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तिने पती रणवीर सिंगसोबत अलिबागमध्ये एक आलिशान घरही खरेदी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत 21 कोटी रुपये आहे. दुसरीकडे, दीपिकाच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज मेबॅक, ऑडी ए8, ऑडी क्यू7 और बीएमडब्ल्यू 5 सारख्या अनेक महागड्या ब्रँडच्या कारचा समावेश आहे.

आज दीपिका पदुकोण अतिशय रॉयल लाइफस्टाईल जगते. जर आपण तिच्या नेट वर्थबद्दल बोललो तर मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची संपत्ती तिचा पती रणवीर सिंहपेक्षा जास्त आहे. असे म्हटले जाते की रणवीर 271 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे, तर दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती 366 कोटी रुपये आहे. मात्र, दीपिकाने आपल्या क्षमतेच्या जोरावर नाव, संपत्ती आणि प्रसिद्धी या सर्व गोष्टी मिळवल्या आहेत. आज जगभरात तिचे खूप चाहते आहेत.